'शेलारानू.. अर्ध्या हळकुंडानं पिवळं कित्याक व्हतास?'

SachinSawant-Ashish Shelar
SachinSawant-Ashish Shelaresakal
Summary

तेलींच्या पराभवामुळं राणे गटाला जबर धक्का बसल्याचं पहायला मिळतंय; पण..

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (Sindhudurg District Bank Election) भाजपनं (BJP) 11, तर महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) 8 जागेवर विजय मिळवलाय. ह्या विजयानं मंत्री नारायण राणे याचं सिंधुदुर्गातील वर्चस्व पु्न्हा एकदा सिध्द झालंय.

मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला असून प्रमुख उमेदवार बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. तर, दुसरीकडं नारायण राणे (Narayan Rane) गटाचे प्रमुख उमेदवार राजन तेली यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांनी पराभवाचा धक्का दिलाय. तेलींच्या पराभवामुळं राणे गटाला जबर धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. मात्र, असं जरी असली तरी सिंधुदुर्ग बँकेवर राणे गटानं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय.

SachinSawant-Ashish Shelar
अखेर राणेंनी सिंधुदुर्गचं मैदान मारलंच; शिवसेनेचा सुपडा साफ

या निकालावर काॅंग्रेस नेत्यानं ट्विट करत भाजपवर निशाणा साधलाय. काँग्रेसच्या सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर कोकणी शैलीत जोरदार टीका केलीय. सावंत म्हणाले, शेलारानू.. अर्ध्या हळकुंडानं पिवळं कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी, आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची 25 वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो, असं त्यांनी कोकणी भाषेत शेलारांना चांगलंच डिवचलंय.

SachinSawant-Ashish Shelar
Sindhudurg : बोलेरो गाडीचं कर्ज थकवणाऱ्यांना 101 नोटिसा पाठवणार

भाजपच्या (BJP) शेलारांनी ट्विट करत, देवांक सोडल्यानं अन् देवचराक धरल्यानं आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्ं...आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो, असं म्हणत महाविकास आघाडीला त्यांनी धारेवर धरलं होतं. नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या (Mumbai Municipal Election) निकालाची ही नांदी असून अमितभाई शाह (Amit Shah) म्हंटल्याप्रमाणं हिम्मत असेल, तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं होतं. मात्र, शेलारांच्या ट्विटला काँग्रेसच्या सचिन सावंतांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com