शिवसेनेला बाहेरून पाठींबा देण्याबद्दल वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 November 2019

कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही, अशी भूमिका काँग्रेसची ठरली असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. मात्र, या संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.  48 तासात चित्र स्पष्ट होईल असं सांगत त्यांनी सेनेसोबत जाण्याचे अप्रत्येक्ष संकेतही दिले

कॉंग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठींबा देणार का? याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. कॉंग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी कॉंग्रेस हाय कमांडशी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यावर हाय कमांड लवकरच निर्णय घेणार असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी  स्पष्ट केलंय.  

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच ही सर्वस्वी भारतीय जनता पक्षाची चूक आहे. महाराष्ट्रातील जनतेने कॉंग्रेसला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही आमचं कर्तव्य बजावणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणालेत. 

जर भाजप आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केली नाही तर काय? हा खरा प्रश्न आहे.  आम्ही अजून ४८ तास वाट पाहू. महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जनतेची भाजपची सत्ता येऊ नये अशी अपेक्षा आहे. गेली पाच वर्ष भाजपने महाराष्ट्राला खड्ड्यात घातल्याची घणाघाती टीका देखी वडेट्टीवार यांनी केलीये. दरम्यान 99 टक्के आमदारांची देखील भाजपची सत्ता येऊ नये अशीच इच्छा आहे असंही कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय.   

दरम्यान महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पेचात कॉंग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठींबा देणार का हा निर्णय हाय कमांड घेणार असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय.  

WebTitle : congress leader vijay vadettiwar on maharashtra government formation conflict

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader vijay vadettiwar on maharashtra government formation conflict