राजकीय भूकंप होणार? काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काँग्रेस नेते पोहचले असून, त्यानंतर निर्णय कळू शकणार आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही शरद पवारांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

मुंबई : राज्याच्या राजकारणात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी आले आहेत. कारणही तसेच आहे, काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले असून, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राजीनामा दिल्यानंतरही फडणवीसच मुख्यमंत्री

भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम असताना दोन्ही पक्ष एकत्र आल्याने आजही पाहायला मिळाले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही चुकीच्या लोकांसोबत गेल्याचे दुःख असल्याचे  म्हटले आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही बोलले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा तिढा पवारांच्या मदतीने सुटणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

युती तुटलेली नाही, चर्चेचे दरवाजे खुले : फडणवीस 

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काँग्रेस नेते पोहचले असून, त्यानंतर निर्णय कळू शकणार आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही शरद पवारांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तर, राज्यपालांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचे आकलन करून पक्षाला निमंत्रित करायला हवे होते. नियमाने काही झालेले नाही. कोणाला निमंत्रण दिले नाही. शरद पवार यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leaders meet NCP chief Sharad Pawar in Mumbai