esakal | ...तर काँग्रेस होणार सत्तेत सहभागी; पाच वर्षासाठी मिळणार 'हे' मोठं पद?
sakal

बोलून बातमी शोधा

congress may be include in power

...तर काँग्रेस होणार सत्तेत सहभागी; पाच वर्षासाठी मिळणार 'हे' मोठं पद?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसने थेट सत्तेत सहभागी व्हावे असे सुचित केले आहे. काँग्रेसने सत्तेत सहभागी होताना राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर सत्ता स्थापनेसाठी सत्तेचे समसमान वाटप हा प्रस्ताव ठेवला असल्याचे सांगण्यात येत आहे. आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीतच हा प्रस्ताव सेनेला देण्याचे ठरले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसने सेनेसमोर प्रस्ताव ठेवताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री राहील तर, काँग्रेसला पाच वर्षे उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे असा प्रस्ताव दिला असल्याने काँग्रेसला थेट पाच वर्षासाठी उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. यातच शिवसेना हा प्रस्ताव मान्य करणार का हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी-शिवसेनेचं ठरलं; असा असेल फॉर्म्युला, काँग्रेसचंही समर्थन?

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा हा सुटत नसताना राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागूही करण्यात आली. त्यानंतर आघाडीच्या झालेल्या बैठकीत काँग्रेसने किमान समान वाटप यावर भर दिला. तर, काँग्रसने थेट सत्तेत सहभागी झाल्याशिवाय राज्यात स्थिर सरकार शक्य नसल्याने काँग्रेसने थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे.

loading image
go to top