काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी तयार; 'या'दिवशी होणार शपथविधी!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

समाधानकारक तोडगा निघाला
महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये सत्तेचे समान वाटप व्हावे यावर एकमत झालेले असून, मंत्रिमंडळातील संख्या आणि खातेवाटप यावर समाधानकारक तोडगा निघाला आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ आणि तारीख ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असून, लवकरच ते याबाबत निर्णय घेतील. कदाचित तीस तारखेला हा शपथविधी सोहळा पार पडेल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. सत्तावाटपाच्या सूत्रामध्ये काँग्रेसला मिळालेली मंत्रिपदे आणि खातेवाटप यावर पक्षाच्या सर्व नेत्यांचे समाधान झाले असून, मंत्री पदांसाठीच्या नेत्यांची यादी अंतिम झाली आहे, असेही थोरात यांनी या वेळी स्पष्ट केले.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन महिना लोटला तरीसुद्धा मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळताना दिसत नाही. या विस्तार विलंबाला काँग्रेसमधील दिरंगाईच कारणीभूत ठरल्याने या पक्षावर पुन्हा टीका होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी तयार झाली असून, परत दिल्लीला जाण्याची आवश्‍यकता नाही, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे असून, अनेक बाबींबाबत निर्णय घेण्यास त्यामुळे विलंब लागतो, मंत्रिपदे आणि खात्यांच्या वाटपांबाबतही सविस्तर चर्चा होणे अपेक्षित असते, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागेल याची कबुली थोरात यांनी या वेळी दिली. 

Video : विश्वास नांगरे-पाटील यांचा 'बाला डान्स' पाहिला का?

दरम्यान, काँग्रेस उपमुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली होती काय, या प्रश्नाला मात्र थोरात यांनी मिश्‍कीलपणे उत्तर दिले. तुम्ही अशा बातम्या चालवायला हरकत नाही, अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत मत मांडले.

समाधानकारक तोडगा निघाला 
महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये सत्तेचे समान वाटप व्हावे यावर एकमत झालेले असून, मंत्रिमंडळातील संख्या आणि खातेवाटप यावर समाधानकारक तोडगा निघाला आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ आणि तारीख ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असून, लवकरच ते याबाबत निर्णय घेतील. कदाचित तीस तारखेला हा शपथविधी सोहळा पार पडेल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. सत्तावाटपाच्या सूत्रामध्ये कॉंग्रेसला मिळालेली मंत्रिपदे आणि खातेवाटप यावर पक्षाच्या सर्व नेत्यांचे समाधान झाले असून, मंत्री पदांसाठीच्या नेत्यांची यादी अंतिम झाली आहे, असेही थोरात यांनी या वेळी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress minister list ready balasaheb thorat