'देशातील OBC समाजाचं नुकसान करण्याचं काम भाजपचं'; नाना पटोले यांचं टीकास्त्र

nana patole
nana patole

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC समाजाचं (OBC Reservation) आरक्षण न्यायालयं रद्द केलं. तेव्हापासूनच राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) विरोधी पक्ष भाजपला (BJP) याबाबत जबाबदार मानत आहे. तर भाजपकडूनही सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका सुरु आहे. आता या वादात उडी घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MLA Nana patole) यांनी थेट केंद्र सरकार भाजपवर टीका केली आहे. (Congress mla nana patole criticized bjp over obc reservation)

nana patole
अवघ्या ५००० रुपयांत द्या भारतातील या टॉप पर्यटन स्थळांना भेट

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC समाजाचं आरक्षण रद्द होणं हा फक्त महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशभरातील ओबीसी समाजाला मोठा धक्का आहे. केंद्र सरकारमध्ये असलेल्या भाजपमुळेच देशभरातील ओबीसींचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. प्रत्येकवेळी ओबीसी समाजाचं नुकसान करण्याचं काम भाजपनं केलंय असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार

दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणावरूनही वातावरण तापलं आहे. खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारला ६ जुनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर ते नवीन पक्ष स्थापन करणार अशी चर्चा रंगली आहे. यावर बोलताना 'लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्यानुसार प्रत्येकजण करतच असतो' असं नानांनी म्हंटलंय.

सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई नाही

राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्ये कुठल्याही प्रकारची श्रेयवादाची लढाई नाही. अनलॉकवर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही नाना पटोले यांनी म्हंटलंय.

nana patole
उपराजधानी हादरली! माउझरच्या धाकावर दोन तास कुटुंब ओलीस; आरोपीला सिनेस्टाईल अटक

केंद्र सरकारकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

कोरोनमुळे नागरिकांना जीव गमवावा लागतो आहे, नागरिकांचे रोजगार गेले आहेत, इंजेक्शन्सचा तुटवडा आहे याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाहीये. नागरिकांचं लक्ष या सर्व गोष्टींपासून विचलित कारण्यासाठी केंद्र सरकार अशा सामाजिक मुद्द्यांना हात घालत आहे. लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजपकडून करण्यात येतंय असंही नाना पटोले यांनी म्हंटलंय.

(Congress mla nana patole criticized bjp over obc reservation)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com