भाजपला रोखण्यासाठी आपल्याला हे करावेच लागेल; दलवाईंचे सोनिया गांधींना पत्र

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी समर्थन दिले पाहिजे. प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती बनवताना आपण शिवसेनेचा पाठिंबा घेतला होता, हे लक्षात घेता आज भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून आपण शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. एक धर्म, एक पक्ष, एक राष्ट्र आणि एक नेता ही भाजपची भूमिका हाणून पाडायची असेल तर हे करावे लागेल. शिवसेनेला समर्थन देताना त्यांचे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वासही त्यांना दिला पाहिजे.

मुंबई : महाराष्ट्रात सत्तापेच निर्माण झाला असताना आता काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यात आतापर्यंत सत्तास्थापनेबाबत एकमत झालेले नाही. दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्यात येत आहे. शिवसेना आमच्या बहुमत असल्याचे सांगत आहे. काँग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते शुक्रवारी सोनिया गांधी यांना भेटले असून, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. 

काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, संजय निरुपम यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याला विरोध केला आहे. तर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेत्यांनी त्याचे समर्थन केले आहे. 

हुसेन दलवाई यांनी सोनिया गांधी यांशिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी समर्थन दिले पाहिजे. प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती बनवताना आपण शिवसेनेचा पाठिंबा घेतला होता, हे लक्षात घेता आज भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून आपण शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. एक धर्म, एक पक्ष, एक राष्ट्र आणि एक नेता ही भाजपची भूमिका हाणून पाडायची असेल तर हे करावे लागेल. शिवसेनेला समर्थन देताना त्यांचे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वासही त्यांना दिला पाहिजे.ना पत्र लिहून म्हटले आहे, की भाजपने एकाही मुस्लिम आमदाराला उमेदवारी दिली नाही, त्याउलट शिवसेनेने साबिर शेख यांना मंत्री केले होते. यावेळी अब्दूल सत्तार यांना उमेदवारी दिली. राज्यात भाजपची सत्ता आली तर त्याचा परिणाम काँग्रेसच्या वाढीवर होईल. पक्ष वाढवणे, टिकविण्याचाही विचार पक्षाने गांभीर्याने केला पाहिजे. भाजप सरकारची मॉब लिंचिंगसाठी समर्थन देणारी, भूमिका व बाबरी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या संभाव्य परिस्थितीबद्दल अधिक संवेदनशील रहाणे गरजेचे आहे. अलीकडे शिवसेनेची भूमिका सर्वसमावेशक घेत असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच भाजपला सत्तेत येण्यापासून रोखणे अत्यावश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP Husain Dalwai said that Shivsena ideology is better than that of the BJP.