Rajani Patil: गांधी घराण्यासाठी लढणाऱ्या रजनी पाटील एकेकाळी चक्क भाजपवासी झाल्या होत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Rajani Patil

Rajani Patil: गांधी घराण्यासाठी लढणाऱ्या रजनी पाटील एकेकाळी चक्क भाजपवासी झाल्या होत्या

संसदेच्या कामकाजादरम्यान व्हिडिओ बनवल्याप्रकरणी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी खासदाराच्या या कारवाईवर कडक कारवाई करत त्यांना उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित केले.

राज्यसभेचे अध्यक्ष धनखर म्हणाले की, सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित एक व्हिडिओ काल म्हणजेच गुरुवारी ट्विटरवर प्रसारित करण्यात आला होता. हा व्हिडिओ गांभीर्याने घेत आम्ही त्यावर आवश्यक ती कारवाई केली.

यामध्ये काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचा सहभाग असल्याचे आढळून आल्याचे सभापतींनी सांगितले, त्यानंतर त्यांना उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले.

रजनी पाटील या माजी मंत्री अशोक पाटील यांच्या पत्नी आहेत. तसेच गांधी घराण्याच्या त्या विश्वासू मानल्या जाणाऱ्यांमध्ये रजनी पाटील यांचा समावेश होतो. रजनी पाटील यांनी राजकारणात काँग्रेसच्या विद्यार्थीं संघटनेतून प्रवेश केला.

पाटील या पहिल्या महाराष्ट्राच्या सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. त्या काँग्रेच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या त्याच बरोबर केंद्रीय समाजकल्याण बोर्डाच्या अध्यक्ष, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष, एनएसयूआय जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, राज्य बँकेच्या सहकारी बँकेच्या संचालक म्हणूनही काम केलेले आहे.

त्यांनी पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.

राजनी पाटील भाजपनेमध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी न दिल्याने पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुक जिंकल्यानंतर त्यांनी काही दिवसांमध्येच पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्या होत्या.

पाटील यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून गैरवण्यात आले आहे.

टॅग्स :CongressBjp