esakal | केंद्रीय मंत्र्यांची हकालपट्टी करावी, नाना पटोलेंची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole

केंद्रीय मंत्र्यांची हकालपट्टी करावी, नाना पटोलेंची मागणी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जातोय. आशिष मिश्राला अटक केली. पण त्यांना न्यायालयीन कोठडीत टाकून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. ३०२ कलमाअंतर्गत कारवाई व्हावी आणि केंद्रीय मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) म्हणाले.

हेही वाचा: Maharashtra Bandh : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी मनसेचं संरक्षण!

लखीमपूर येथील दुर्दैवी घटनेच्या विरोधात महाराष्ट्र बंद आहे. व्यापारीसुद्धा यामध्ये सहभागी झाले आहेत. मोदींचे सरकार केंद्रात आल्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. या बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांचे धन्यवाद. राज्यात महाविकास आघाडीच्यावतीने बंद होत असून केंद्रातील अत्याचारी भाजपला हा धडा आहे, असेही पटोले म्हणाले.

१५ हजार कोटी रुपये आम्ही नुकसानीसाठी केंद्राला मागितले होते. तो आमचा अधिकार आहे. त्याऐवजी त्यांनी फक्त दीड हजार कोटी देण्याची घोषणा केली आहे. पण, अजून मिळाले नाही. काही भागात पाऊस नाही. त्यामुळे शेतीच्या पंपाला विद्युत राहिली नाही. कोळशाअभावी अनेक विद्युत पुरवठा केंद्र बंद झाले आहेत. महाराष्ट्र अंधारात जाण्यासाठी केंद्र पुरेपुर प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येच अशी परिस्थिती निर्माण झाली. हे दोन्ही भाजपविरोधी राज्य आहे, त्यामुळेच अशा घटना घडतात. दबावतंत्र आम्ही मान्य करणार नाही, असं केंद्र सरकार म्हणतंय. महाविकास आघाडी सरकारला संवेदना आहेत. त्यामुळेच सरकार शेतकऱ्यांना मदत करत असल्याचेही पटोले म्हणतात.

loading image
go to top