मोदी-शहांच्या इशाऱ्याने कट; पटोले यांचा काँग्रेस नेत्यांवर आरोप

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेस त्यागानंतर काँग्रेसमधील दुही अधिकच स्पष्टपणे समोर येऊ लागली आहे
Congress Nana Patole Gulam Nabi Azad China border dispute pm narendra modi amit shah mumbai
Congress Nana Patole Gulam Nabi Azad China border dispute pm narendra modi amit shah mumbai Sakal
Updated on

मुंबई : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेस त्यागानंतर काँग्रेसमधील दुही अधिकच स्पष्टपणे समोर येऊ लागली आहे. देशात आज गंभीर परिस्थिती आहे. सीमेवर चीनच्या कारवाया वाढलेल्या आहेत. संविधान धोक्यात आहे. अशावेळी भाजपला प्रश्न विचारण्याऐवजी काँग्रेस नेते पक्षालाच बदनाम करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेसचे जी २३ नेते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर कटकारस्थाने रचत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला.

काँग्रेसच्या प्रशिक्षण आणि प्रबोधन समितीच्या वतीने नवी मुंबईत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पटोले यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली. काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पत्र पाठविणाऱ्या जी २३ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. पटोले म्हणाले, की काँग्रेसने नेत्यांना पदे, प्रतिष्ठा दिला. परंतु, एखादे पद मिळाले नाही म्हणून स्वार्थापोटी काही नेते पक्ष सोडत आहेत. सीमेवर चीनच्या कारवाया वाढलेल्या आहेत. संविधान धोक्यात आहे. अशावेळी भाजपला प्रश्न विचारण्याऐवजी हे नेते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर काँग्रेसलाच बदनाम करत आहेत,अशी टीका त्यांनी केली.

तरुणांना काँग्रेसशी जोडणार

देशात महागाई, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. संविधान उद्ध्वस्त करण्याचे काम केले जात आहे. केंद्रातील सरकारचे हे अपयश जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, लोकांपर्यंत वास्तव पोहचावे यासाठी काँग्रेस पक्षाने शिबिरांचे आयोजन केले आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपचा पर्दाफाश करणे ही या प्रशिक्षणामागची संकल्पना आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. तसेच तरुणांना काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्नही आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com