Nana Patole : 'नागपूरची चड्डी' घातली तर डायरेक्ट सचिव पदावर जाऊ शकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nana Patole

Nana Patole : 'नागपूरची चड्डी' घातली तर डायरेक्ट सचिव पदावर जाऊ शकता

मुंबई : "जर तुम्हाला प्रशासकीय सेवेत जायचं असेल, जिल्हाधिकारी व्हायचं असेल किंवा पोलीस विभागात जायचं असेल तर तुम्हाला युपीएससी किंवा एमपीएससी द्यायची गरज नाही, तुम्ही नागपूरची चड्डी घातली तरीही तुम्ही संयुक्त सचिव पदावर जाऊ शकता" असं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर भाजप नेत्यांनी टीका केली आहे.

(Nana Patole On RSS)

"सध्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाही संपवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, न्यायव्यवस्थाही सध्या धोक्यात आली असून सुप्रीम कोर्टाचे न्यायधीशही माध्यमांसमोर येऊन आम्ही असुरक्षित असल्याचं सांगतात, तर तुम्हाला प्रशासकीय सेवेत जायचं असेल तर स्पर्धा परिक्षा देण्याची गरज नाही कारण नागपूरची चड्डी घातली तर तुम्ही थेट संयुक्त सचिव पदावर नियुक्त होऊ शकतात" अशी मिश्किल टीका नाना पटोलेंनी केली आहे.

हेही वाचा: Rain Updates : मान्सूनच्या निरोपाआधीच पावसाने झोडपले; ४ दिवस राहणार गडगडाट

भाजपच्या राजकारणावर टीका करताना नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला असून संघाच्या गणवेशावर मिश्किल टीका केली आहे. तर संघाचा व्यक्ती प्रशासकीय सेवेत परिक्षा न देता जाऊ शकतो असा दावा त्यांनी केला आहे.

त्यांच्या या टीकेला भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले असून "महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून त्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. आपण काय बोलतो याचं त्यांना भान राहिलं नाही. आता वसुली बंद झाली आहे म्हणून ते काहीही बोलतात असं भाजपचे नेते राम कदम म्हणाले आहेत. त्याचबरोबर हिंदुंच्या द्वेष करणाऱ्या काँग्रेस नेत्यांकडून आमच्या काही अपेक्षा नाहीत असंही राम कदम म्हणाले आहेत.