महाविकासआघाडीचे नेतेमंडळी राजभवनावर दाखल; सरकार स्थापनेचा करणार दावा

टीम ई-सकाळ
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतेमंडळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे दिला.

सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब झाले. ही बैठक झाल्यानंतर आता लगेचच राज्यात सरकार स्थापनेसाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून दावा केला जाणार आहे. त्यानुसार नेतेमंडळी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवन येथे दाखल झाले आहेत.

आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेतेमंडळी सध्या राजभवन येथे उपस्थित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress NCP Shivsena leaders reached in Raj Bhavan