असदुद्दीन ओवैसी २०१९ ला...; काँग्रेसकडून फडणवीसांची पोलखोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress sachin sawat criticized drvendra Fadnavis over Asaduddin Owaisi visit Aurangzeb grave in 2019

असदुद्दीन ओवैसी २०१९ ला...; काँग्रेसकडून फडणवीसांची पोलखोल

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, यावरून राज्यात वातावरण तापलं आहे, काल मुंबईत झालेल्या सभेत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Drvendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर यावरून जोरदार हल्ला चढवला. दरम्यान या प्रकरणावर कॉंग्रेसचे नेत सचिन सावंत य़ांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे, सोबत ते म्हणाले आहेत की, औरंगजेबाची कबर ही भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मोदी सरकार प्रवेश नियंत्रित करु शकते, वा बंदीही घालू शकते, मोदी सरकार ओवैसीविरोधात तक्रार का नोंदवत नाही? असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

पुढे त्यांनी, भाजपचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष खालीद बाबू कुरेशी फडणवीस साहेबांनी वर्णिलेले कार्य करताना पाहा, असे म्हणत यासंबंधीचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.

हेही वाचा: केतकी चितळे समर्थन प्रकरणी सदाभाऊ खोत याचं स्पष्टीकरण, म्हणाले...

तर सचिन सावंत यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या व प्रवक्त्या, जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. दाराकशान अन्दराबी यांनी कोरोना काळात औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती, असे म्हटले आहे. त्यापुढे त्यांनी, फडणवीसजी मुख्यमंत्री असताना २०१९ ला असदुद्दीन ओवेसी कबरीवर गेले होते. मग मविआ सरकारविरोधातच बोंब का? असा सवाल देखील विचारला आहे.

हेही वाचा: जर मोदी तुरुंगात जाऊ शकतात तर फडणवीसही....; सचिन सावंतांची टीका

Web Title: Congress Sachin Sawat Criticized Drvendra Fadnavis Over Asaduddin Owaisi Visit Aurangzeb Grave In 2019

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top