केतकी चितळे समर्थन प्रकरणी सदाभाऊ खोत याचं स्पष्टीकरण, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp protest against sadabhau khot over support actress ketaki chitale

केतकी चितळे समर्थन प्रकरणी सदाभाऊ खोत याचं स्पष्टीकरण, म्हणाले...

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केलेली अभिनेत्री केतकी चितळेचं समर्थन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, सोलापूरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी खोत यांच्या दालणात घुसून आक्रमक आंदोलन केले, दरम्यान याबद्दल सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण केतकी चितळेच्या पोस्टचे समर्थन केले नसल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की, केतकी चितळेला अटक झाल्यानंतर ज्या पध्दतीने हल्ला केला, सत्ताधारी पक्ष पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लोकांवर हल्ला करत असतील तर सामान्य माणसाचा प्रशासनावर विश्वास उडेल ही भूमिका मी मांडली आहे. मी केतकी चितळेच्या न्यायालयातील भूमिकेचं समर्थन केलं नाही, तीने तिची बाजू मांडली, कायद्याला अनुसरुन कारवाई होईल. मी शरद पवार यांच्याबद्दल अक्षेपार्ह पोस्टचं समर्थन केलं नाही, असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: केतकी चितळेचं सदाभाऊंकडून समर्थन; म्हणाले, ती कणखर...

खोत काय म्हणाले होते?

केतकी चितळे ही कणखर आहे, कारण कोर्टात कुठलाही वकील न देता तीनं एकटीनं आपली बाजू मांडली. त्यामुळं तिला कोणाच्या समर्थनाची गरज नाही. केतकीच्या पोस्टवर तुमच्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या, हे धंदे आता बंद करा, असे सदाभाऊ खोत म्हणाले होते.

सरकार पुरस्कृत दहशतवाद तुम्ही राज्यात वाढवत आहात का? तुमच्या पोलिसांवर तुमचा विश्वास नाहीए का? हा ही या निमित्तानं मुद्दा पुढे येतो. दुसऱ्या बाजूला या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय पदव्या दिलेल्या होत्या. त्यांच्या पत्नीबद्दल तुम्ही काय बोलले होते. चंद्रकांत पाटलांबद्दल तुम्ही काय बोलला होतात. यावेळी कुठे गेली ती नैतिकता? आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची चीड निर्माण होते तेव्हा एक समाज म्हणून तिला टार्गेट केलं जातं, असंही यावेळी केतकीची बाजू घेताना सदाभाऊ खोत म्हणाले.

हेही वाचा: पुण्यात स्मृती इराणी यांना चूल-बांगड्या देण्याचा प्रयत्न

Web Title: Ncp Protest Against Sadabhau Khot Over Support Actress Ketaki Chitale He Explains

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top