esakal | फडणवायसीस आजारातून पंकजाताई लवकर बऱ्या होवोत - काँग्रेस | Congress
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis, Pankaja Munde

फडणवायसीस आजारातून पंकजाताई लवकर बऱ्या होवोत - काँग्रेस

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सध्या थेट शेतकऱ्याच्या (farmer loss) बांधावर जाऊन पाऊस (rain) आणि पुरामुळे (flood) झालेल्या पीकाच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. काल फडणवीस यवतमाळमध्ये होते. लवकरच ते मराठवाड्यातही जाऊन शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतील. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असण्याबरोबरच राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे अशा पाहणी दौऱ्याच्यावेळी त्या-त्या भागातील प्रस्थापित नेतेही सोबत असतात.

पण देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्यावेळी पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाहीत. आजारी असल्यामुळे आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाडा दौरा आणि पंकजा मुंडे यांचे आजारपण यावरुन राजकीय वतुर्ळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. डॉक्टरांनी दोन ते चार दिवस त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या काळात कोणता फोन कॉल घेऊन शकत नाही तसेच कोणाला भेटू शकत नाही, असे पंकजा मुंडे यांनी काल केलेल्या आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: मुलीच्या आईस्क्रीमसाठी त्याने लोअर परेल ब्रिजवर अचानक गाडी वळवली आणि...

पंकजा मुंडे यांच्या या आजारपणावरुन काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "फडणवायसीस (Fadnaviasis) आजारातून पंकजाताई लवकर बऱ्या होवोत हीच सदिच्छा" असे उपरोधिक टि्वट सचिन सावंत यांनी केले आहे.

loading image
go to top