esakal | Aryan Khan | NCBकडून 'त्या' दोघांविषयी उडवाउडवीची उत्तरं! काँग्रेसचा आक्षेप
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan khan selfie

NCBकडून 'त्या' दोघांविषयी उडवाउडवीची उत्तरं! काँग्रेसचा आक्षेप

sakal_logo
By
ओमकार वाबळे

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात रेव्ह पार्टीतून एनसीबीने ताब्यात घेतलं. यानंतर त्याला एनसबी कार्यालयात नेणाऱ्या तसेच कारवाईदरम्यान सतत सोबत असणाऱ्या काही व्यक्तींबद्दल संशय व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्ती एनसीबीच्या अधिकारी नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर यातील भानुशाली नावाच्या माणसाचा थेट भाजपशी संबंध असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. भानुशाली यांचे मोदी-शहांपासून अनेक भाजप नेत्यांसोबत फोटोही व्हायरल झाले. यानंतर राजकीय वाद-प्रतिवादाला सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही संबंधित प्रकरणात काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

सावंत यांनी एनसीबीचे नियम आणि लेट डाऊन प्रोसिजर हॅन्डबुकचा दाखला दिला.

अंमलीपदार्थ कायदा अंमलबजावणी अधिकारी कोणत्याही कामाला जायचा असेल, आणि अटक केलेला आरोपी घेऊन जायचं असेल तर त्याला दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवायला हवं, आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहमती असली पाहिजे, त्यावर दोन्ही अधिकाऱ्यांच्या सह्या हव्यात, असं असताना एक खासगी, भाजप पदाधिकारी व्यक्तीच्या हातात कास्टडी कशी दिली? असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला.

काय काळजी अधिकाऱ्याने घ्यायला हवी ? यावर त्यात लिहिलंय - ज्याने अटक केलीय, त्या अटक झालेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर सादर करायला हवं, ज्याने अटक केलीय, तोच अटक करू शकतो, आणि त्याच्याकडे कास्टडी हवी , त्याचीच जबाबदारी आरोपीच्या सुरक्षिततेची असेल, अशी माहिती सावंत यांनी दिली.

काय म्हणाले सचिन सावंत?

ज्या अधिकाऱ्याकडे आरोपी आहे, त्याने नियमांचा उल्लंघन केल्यास त्याच्यावर १० वर्षापेक्षा जास्त शिक्षा आणि 1 लाख रुपयेकिमान दंड घेतला जावा

सेक्शन ८५ प्रमाणे त्याच्याकडून चूक झालेली आहे, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी.

NCB च्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई लवकरात लवकर करावी.

loading image
go to top