देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नाना पटोले सागर बंगल्यावर | Devendra fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नाना पटोले सागर बंगल्यावर

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नाना पटोले सागर बंगल्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. विधान परिषद निवडणुकी संदर्भात (Mlc Election) चर्चा करण्यासाठी पटोले फडणवीसांची भेट घेत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

काँग्रेसचे विधानपरिषदतील गटनेते शरद रणपिसे यांच्या मृत्यूमुळे एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. या जागेसाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छूक होते.

हेही वाचा: देशात डिजिटल तंत्रज्ञानाने लोकांचे आयुष्य बदलले - पंतप्रधान मोदी

राज्यसभेचे खासदार असलेले राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला सक्रीय राजकारणात उतरवण्याची काँग्रेसची भूमिका आहे.राजीव सातव यांनी पक्षासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्याची पक्षाची भूमिका आहे. राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी डॉ प्रज्ञा सातव यांना या जागी संधी दिली पाहिजे असा मतप्रवाह पक्षात होता. विधानपरिषदेच्या या जागेसाठी 29 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे, तर 16 नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे

loading image
go to top