Nashik Graduate Election : काँग्रेसचा तांबेंना झटका! सुधीर तांबें पक्षातून निलंबित

congress suspends sudhir tambe from party  satyajit tambe father Nashik graduate election maharashtra politics
congress suspends sudhir tambe from party satyajit tambe father Nashik graduate election maharashtra politics

Nashik Graduate Election : नाशिकच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात अखेर काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचे वडिल सुधीर तांबे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

कॉंग्रेसने त्यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली होती, त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला होता. तरी देखील त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही, याच पार्श्वभूमिवर सत्यजीत तांबेंचे वडिल सुधीर तांबे यांना निलंबित करण्यात आले आहे.

congress suspends sudhir tambe from party  satyajit tambe father Nashik graduate election maharashtra politics
Maharashtra Politics : "तिळगुळ घ्या आणि…"; मकर संक्रांतीनिमीत्त आदित्य ठाकरेंच्या शिंदे सरकारला शुभेच्छा अन् टोमणे

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांची अधिकृत घोषणा केली, पण त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे हे पक्षातून निलंबित असणार आहेत.

congress suspends sudhir tambe from party  satyajit tambe father Nashik graduate election maharashtra politics
Nagpur News : संक्रांत कडू झाली! बापासमोरचं पोटच्या लेकराचा दुर्दैवी अंत; माजांने घेतला बळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com