काँग्रेस उद्या राजभवनाला घालणार घेराव; नाना पटोलेंनी दिला इशारा

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्यावतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
NanaPatole_Raj Bhavan
NanaPatole_Raj Bhavan

मुंबई : वाढती महागाई आणि इतर विविध मुद्यांवर काँग्रेसच्यावतीनं उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर याच मुद्द्यावरुन राजभवनाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. (Congress will lay siege to Raj Bhavan tomorrow Nana Patole warned)

NanaPatole_Raj Bhavan
पक्ष चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या काँग्रेस आंदोलन करेल. या माध्यमातून अतिवृष्टी, अग्निपथ योजना महागाई, बेरोजगारी या सर्व मुद्द्यांवर संपूर्ण देशभरात काँग्रेस आंदोलन करणार आहे. यासाठी राज्यपाल भवनावर देखील आम्ही आंदोलन करणार आहोत त्यांना घेराव घालणार आहोत. तसेच यावेळी त्यांना आम्ही याबाबत निवेदन देणार आहोत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com