
Abdul Sattar: मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गटातील नेत्याचाच माझ्याविरोधात कट; सत्तारांचा खळबळजनक आरोप
औरंगाबाद : मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गटातील एका नेत्याकडूनच माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळं शिंदे गटातच अंतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचं यानिमित्तानं समोर आलं आहे. (Conspiracy against me by one of Shinde group leader Abdul Sattar sensational allegation)
हेही वाचा: Rahul Gandhi : माझ्या बदनामीसाठी भाजपने ५ हजार कोटी खर्च केले, पण...; राहुल यांचा सनसनाटी आरोप
कथीत टीईटी घोटाळा प्रकरण मी मंत्री असतानाचं बाहेर का आलंय? तर या प्रकरणात मी पंचवीस पैशाचाही फायदा घेतलेला नाही. यासाठीच्या कागदाची किंमत पगार नाहीतर नोकरीसाठी असते. आम्ही यामध्ये कसलाच घोटाळा केला नाही असा रिपोर्ट आयुक्तांनी दिला, जिल्हा शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक यांनीही दिला. यापेक्षा आता काय प्रुफ पाहिजे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. यामागे माझ्या पक्षातील लोक असतील, माझे हितचिंतक असतील किंवा विरोधीपक्षातील ज्यांच्या खुर्च्या खाली झाल्या, जे मलई खात होते ते ही असतील.
माझ्याविरोधात जी बातमी आली त्यावर मला शंका आली की मुख्यमंत्र्यांच्या घरात आमची जी चर्चा झाली ती बाहेर मीडियापर्यंत आली. मग मी मुख्यमंत्र्यांना याची तक्रार दिली की आपल्या चर्चेतील गोष्टी बाहेर कशा जातात? पण याबद्दल मी बोलणार नाही. पण तो नेता महाराष्ट्रातील आहे. माझ्यापेक्षाही विरोधकात माझे हितचिंतक अनेक आहेत. त्यामुळेही हे लोक जळत असतील.
हेही वाचा: Rishabh Pant Accident : 'मी तुझ्यासाठी...' उर्वशीला राहवेना, ऋषभसाठी नवं ट्विट!
टीईटी घोटाळा, गायरान जमीन घोटाळा आणि सुप्रिया सुळेंवरील विधानामुळं चर्चेत आलेल्या सत्तारांच्या राजीनाम्याचे आरोप केले जात आहेत. यावर बोलताना सत्तार म्हणाले, माझ्यावर देवाचा आशीर्वाद असल्यानं कदाचित मी या आरोपांमधून बाहेर पडू शकतो. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व माहिती दिली. त्यात काहीही नाही.
पण माझ्यावर राजकीय सुडबुद्धीनं आरोप झालेत. याला उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. हे उत्तर मी दिलं, मला विरोधीपक्षाबद्दल केविलवाणी अवस्था बघून आश्चर्य वाटतं की, मी राज्यमंत्री असतानाही माझ्यावर त्यांनी अनेक आरोप केले. जून जुलैमध्ये मी मंत्री नसतानाही मला विरोधीपक्ष नेते अजित पवारांना माझ्याबद्दल चिंता आहे. मी सुप्रीया सुळेंबद्दल बोललो, मी राष्ट्रवादीत गेलो नाही किंवा मी त्यांच्याविरोधात बोलतो म्हणून त्यांची माझ्यावर चीड आहे,असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
हेही वाचा: Urfi Javed: चित्रा वाघ यांच्या धमकीला दिली नाही किंमत, उर्फी नव्या दमाने नव्या स्टाईलमध्ये
सत्तारांनी टोकाची भूमिका घेऊ नये - गोगावले
सत्तारांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया दिताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले, "पहिल्यांदा त्यांना जे काही मंत्रीपद दिलेलं आहे ते मुख्यमंत्री शिंदेंनी केलेलं आहे. त्याचं काम ते करत आहेत. ते काम करतात म्हणजे छोट्यामोठ्या चुका होत असतात. पण त्यांनी एवढी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. आम्ही मंत्रीपदाच्या रांगेत आहोत पण आम्ही कधी काही बोलतोय का? आमच्यासारखी मंडळी समजून घेऊन चाललेले आहेत"