बांधकाम कामगार नोंदणीत घोटाळा! ४ वर्षांत सोलापुरात वाढले सव्वालाख कामगार; एजंटांनी पैसे घेतले, ठरावीक ठेकेदारांनी दिली अनुभव प्रमाणपत्रे, वाचा...

सोलापूर जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये २० हजार ८७० इतके नोंदणीकृत बांधकाम कामगार होते. मात्र, एजंटांच्या मध्यस्थीने काही ठेकेदारांकडून ९० दिवसांचे अनुभव प्रमाणपत्र घेऊन सोलापुरातील अनेकजण बांधकाम कामगार झाले आहेत. त्यामुळे तीन वर्षांतच सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची संख्या एक लाख ५७ हजारांवर पोचली.
ogus Labour Registration Scam, Authorities Act

Bogus Labour Registration Scam, Authorities Act

Sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये २० हजार ८७० इतके नोंदणीकृत बांधकाम कामगार होते. मात्र, एजंटांच्या मध्यस्थीने काही ठेकेदारांकडून ९० दिवसांचे अनुभव प्रमाणपत्र घेऊन सोलापुरातील अनेकजण बांधकाम कामगार झाले आहेत. त्यामुळे तीन वर्षांतच सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची संख्या एक लाख ५७ हजारांवर पोचली. आर्थिक लाभ हेच त्यामागील प्रमुख कारण आहे.

२०२० पासून बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाइन झाली. नोंदणीसाठी १८ ते ६० वयाचा पुरावा लागतो. याशिवाय रहिवासी पुरावा, ओळखपत्र, फोटो आणि ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र लागते. सर्व कागदपत्रे बनावट अपलोड करून अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर व सोलापूर शहरातील काही व्यक्तींनी बांधकाम कामगार पती किंवा पत्नीचा मृत्यू झाल्याचे दाखवून शासनाच्या योजनेचा लाभ घेतल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मागील लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील एजंटांनी सर्वांसाठी ही योजना असल्याचे सांगून १३०० रुपये ते २५०० रुपये घेऊन अनेकांची नोंदणी केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली. विशेष म्हणजे सध्या नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांमध्ये शेतकरी, अन्य कामांवरील कामगार (ज्यांना बांधकामाच्या साहित्याची देखील माहिती नाही असे) आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार

  • नोंदणी कालावधी एकूण नोंदणी

  • २०२१-२२ २०,८७०

  • २०२२-२३ ५३,८८७

  • २०२३-२४ ६६,५३९

  • २०२४-२५ १,५७,७००

  • २०२५-२६ १,५९,३००

सगळा खटाटोप ‘या’ योजनांसाठी

  • विवाह सहाय : विवाहासाठी ३० हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते.

  • अवजारे खरेदीसाठी अर्थसाह्य : कामासाठी आवश्यक अवजारे खरेदीसाठी पाच हजारांपर्यंत अर्थसाह्य.

  • वैद्यकीय साहाय्य : अपघात, अपंगत्व आल्यास वैद्यकीय खर्चासाठी मदत. अपघाती मृत्यूनंतर तीन लाखापर्यंतची भरपाई.

  • लॅपटॉप व भांडी संच योजना : नोंदणीकृत कामगारांना किंवा त्यांच्या मुलांना मोफत लॅपटॉप. कुटुंबाला मोफत भांडी संच.

  • शिष्यवृत्ती योजना : पहिल्या दोन मुलांना (इयत्ता पहिली ते पदव्युत्तर पदवीपर्यंत) दरवर्षी २५०० रुपये ते एक लाखांपर्यंत शिष्यवृत्ती

ठरावीक ठेकेदारांचीच अनुभव प्रमाणपत्रे

विधानसभा, लोकसभा, महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी बांधकाम कामगार नोंदणीची शिबिरे देखील घेतली. त्यात अनेकांचे तालुके वेगळे, पण बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्रे ठरावीक ठेकेदारांचीच जोडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लेबर सेस न भरताच काही ठेकेदारांनी त्या व्यक्तींनी आपल्याकडेच काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र शेकडो लोकांना दिली आहेत.

योग्य व्यक्तींना लाभ मिळावा हाच उद्देश

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील गैरप्रकार थांबावेत, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आता चौकशी केली जात आहे. शासकीय योजनांचा लाभ योग्य पात्र व्यक्तींपर्यंत पोचावा, हा त्यामागील हेतू आहे.

- महेश झोळे, सहायक कामगार आयुक्त, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com