ग्राहकांनो, वीजेचे ‘हे’ उपकरण बसवा, शॉक लागला तरी मृत्यू होणार नाही! विद्युत धक्क्यापासून बचावासाठी पावसाळ्यात ‘सर्किट ब्रेकर’ ठरतयं सुरक्षा कवचाचे काम

वायरिंगमधील करंट लिकेज किंवा योग्य क्षमतेचे सर्किट ब्रेकर, अर्थिंग नसणे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून घर किंवा इतर वास्तुंमध्ये सर्किट ब्रेकर (‘इएलसीबी’, ‘आरसीसीबी’, ‘एमसीबी’) लावावे, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे. त्यातून विजेचा शॉक लागला, तरी मृत्यू होत नाही.
maharashtra
msebsakal

सोलापूर : पावसाने जोर धरल्याने विद्युत अपघाताचे धोके वाढत असून त्यामागे वायरिंगमधील करंट लिकेज किंवा योग्य क्षमतेचे सर्किट ब्रेकर, अर्थिंग नसणे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून घर किंवा इतर वास्तुंमध्ये सर्किट ब्रेकर (‘इएलसीबी’, ‘आरसीसीबी’, ‘एमसीबी’) लावावे, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे. त्यातून विजेचा शॉक लागला, तरी मृत्यू होत नाही.

वीजसंच मांडणीमध्ये विजेचा धोका टाळण्यासाठी योग्य ‘अर्थिंग’ अत्यावश्यक आहे. घरगुती किंवा इतर आस्थापनांमधील अंतर्गत वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास आणि वीजपुरवठा खंडित न होता सुरू राहिल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असते. वीजपुरवठा तत्काळ खंडित होणे आवश्यक आहे. यासाठी घर, सोसायट्या किंवा इतर वास्तुंमध्ये सर्किट ब्रेकर जसे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (इएलसीबी), रेसिड्यूअल करंट सर्किट ब्रेकर (आरसीसीबी) मिनिएच्यूअर सर्किट ब्रेकर (एमसीबी’) लावणे जरूरी आहे. अंतर्गत वायरिंग किंवा उपकरणामधील दोषामुळे सर्किट ब्रेकर म्हणजे विद्युत अपघात टाळणारे प्राथमिक व महत्वाचे सुरक्षा कवच आहे. विद्युत अपघात टाळण्यासाठी ‘अर्थिंग’ योग्य स्थितीत आहे व त्याची किमान दोन वर्षांनी खात्री करून घेणे आवश्यक आहे. नवीन वास्तू बांधताना प्रामुख्याने अर्थिंगसह सर्किट ब्रेकर लावणे अनिवार्य आहे. मात्र जुन्या वास्तुंमध्ये ते नसल्यास तत्काळ लावणे आवश्यक आहे.

सर्किट ब्रेकर सुरक्षा कवच म्हणजे काय?

विविध उपकरणांचा क्षमतेपेक्षा अधिक वीज वापर, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये दोष निर्माण होऊन करंट लिकेज होणे, शॉर्टसर्किट होणे, व्होल्टेज वाढणे, अर्थ फॉल्ट होणे आदी प्रकारांपासून होणारे विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्कीट ब्रेकरकडून वीजप्रवाह खंडित केला जातो. हा सर्कीट ब्रेकर साधारणतः दोन हजार ते तीन हजार रुपये किंमतीत मिळतो. सर्कीट ब्रेकर सुरक्षा कवच असल्याने ते प्राधान्याने घर, कार्यालयात लावणे सुरक्षित आहे.

विद्युत टेस्टर म्हणजे लाईफ सेव्हर

बाजारात सुमारे २० ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या विद्युत टेस्टरमुळे वीज अपघाताचे धोके टाळता येतात. ओल आलेल्या भिंतीला, टिनपत्र्याला, कपडे वाळत घालायच्या लोखंडी तारेला, फ्रीज, टिव्ही, संगणक, गिझर किंवा पाण्याचे नळ, कुलर आदींना हात लावल्यावर झिणझिण्या येत असतील तसेच ओलसर लोखंडी पाईप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपांला स्पर्श करण्यापूर्वी विद्युत टेस्टरने त्याची तपासणी करावी. पायात रबरी किंवा प्लास्टिक चप्पल वापरावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com