
सांगली जिल्ह्यातल्या तांदुळवाडी इथल्या हर्षल पाटील नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. हर्षल सरकारी कंत्राटदार होता आणि त्याला सरकारी कामाची बिलं वेळेत मिळत नव्हती. यातून आलेल्या नैराश्यातूनच त्यानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप आता होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.