फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmi Sukla Phone Tapping Case

फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती

फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती मिळाली आहे. शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती एसीसीकडून मंजूर करण्यता आली आहे. (Controversial phone tapping case Rashmi Shukla promoted )

मिळालेल्या माहितीनुसार, अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांच्यासह २० आयपीएस अधिकाऱ्यांनाही बढती मिळाली आहे. काल दिल्ली येथे मोठी बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

काय आहे फोन टॅपिंग प्रकरण?

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राने ऐतिहासिक असे राजकीय नाट्य अनुभवले होते. शिवसेनेने भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती.

हे सर्व राजकीय नाट्य तब्बल ३६ दिवस सुरु होते. या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप होता.

गुप्तवार्ता विभागाने रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून टॅप केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप करायचे आहेत, त्यांची बनावट नावं सांगून, हा सगळा उद्योग करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या.

टॅग्स :rashmi shukla