

solapur indira gandhi park stedium
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : येथील सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर १ डिसेंबर रोजी महाराष्ट्रविरुद्ध हिमाचल या संघात क्रिकेट सामना होणार आहे. १९ वर्षांखालील या क्रिकेट संघात कुचबिहारी ट्रॉफीसाठी हा सामना खेळविला जाणार आहे. २८ नोव्हेंबरला दोन्ही संघ सोलापुरात दाखल होणार आहेत.
राज्याच्या १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात सोलापूरचा समर्थ दोरनाल हा एकमेव खेळाडू आहे. सध्या मैदानावरील काही ठिकाणी गवत सुकलेले तर काही ठिकाणी वाढलेले आहे. खेळाडू घसरून पडू नयेत म्हणून ग्रास कटिंग सुरू आहे. दुसरीकडे विकेटवरील गवत (खेळपट्टी) देखील कटिंग करणे सुरू आहे. ड्रेसिंग रूमची पण स्वच्छता केली जात आहे. कुचबिहारी ट्रॉफीच्या सामन्यापूर्वी आता त्या बाबींवर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी काम करीत आहेत. सोलापूरकरांना हा सामना मोफत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंची राहण्याची, जेवणाची सोय बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. १ ते ४ डिसेंबरपर्यंत हा सामना खेळला जाणार आहे. पार्क स्टेडिअम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात दिल्यापासून डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनकडून दररोज त्याची देखभाल केली जात आहे.
दरम्यान, पार्क स्टेडिअमवर फ्लड लाईटची गरज आहे. ती लाईट बसविल्यानंतर त्या मैदानावर दिवसरात्र सामना खेळवला जाऊ शकतो. सोलापूरच्या या मैदानावर अजूनपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. या मैदानाची १८ ते २० हजार प्रेक्षक क्षमता आहे. मैदानही मोठे असल्याने २०-२० सामना होऊ शकतो, असे डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यात सोलापुरात टी-ट्वेंटी सामना व्हावा, यासाठी डिस्ट्रिक्ट असोसिएशनचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे प्रयत्न देखील सुरू आहेत.
सामन्याची जय्यत तयारी
महापालिकेकडून इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी अंदाजे सव्वाकोटी रुपये खर्च करावे लागतील. त्याठिकाणी खेळाडूंसाठी नऊ खोल्या, जीम, कॅफे, स्वीमिंग टॅंक केला जाणार आहे. जेणेकरून मैदानावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामने होतील.
- चंद्रकांत रेंबुर्से, सरचिटणीस, डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन, सोलापूर
सामना मोफत पाहण्याची संधी
चार दिवसांचा महाराष्ट्रविरुद्ध हिमाचल संघातील सामना सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहील. चार दिवसांचा हा सामना असणार आहे. शहर-जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, खेळाडूंसह महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत सामना पाहता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.