COP26 परिषदेत महाराष्ट्राला पुरस्कार; भारतातील एकमेव राज्य

uddhav thackeray
uddhav thackeraysakal
Summary

स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership साठी पुरस्कार मिळाला.

जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम याबाबत संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद स्कॉटलंडमध्ये सुरु आहे. या परिषदेत जागतिक पातळीवर महाराष्ट्राने हवामन बदलासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं. COP26 परिषदेत महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership पुरस्कार मिळाला आहे. Under2 Coalition Leadership Awards 2021 पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. स्कॉटलंडमध्ये तीन पुरस्कारापैकी असलेला हा एक पुरस्कार महाराष्ट्राने पटकावला असून राज्याच्यावतीने महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुरस्कारानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारतात महाराष्ट्राला पुढाकार घ्यायचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी आहेत. त्यांनीच हरित भविष्य पाहण्याची प्रेरणा दिली आहे. माय प्लॅनेट अशी चळवळ आम्ही सुरु केली असून निसर्गाच्या पारंपरिक पाच घटकांकडे जास्त लक्ष देत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership साठी पुरस्कार मिळाला. आपल्या Climate Partnerships & Creative Climate Solutions ची येथे विशेष दखल घेतली. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

uddhav thackeray
बँक घोटाळा प्रकरण | माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला CBI कडून अटक

तसंच शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान असल्याची भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com