Corona Update: राज्यात 31,671 कोरोना बाधित रुग्ण बरे

Corona Update: राज्यात 31,671 कोरोना बाधित रुग्ण बरे

मुंबई: राज्यात काल 21,273 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली होती तर आज नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्यात आज 20,740 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 31,671 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 53,07,874 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,89,088 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.24% झाले आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 16 लाख 40 हजार 014 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 27 मे 2021 रोजी 2,80,756 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. (Corona 31671 corona infected patients cured in the state Increase in lockdown)

मुंबईमध्ये आज नवे 929 रुग्ण आढळले आहेत. आज 1239 रुग्ण बरे झाले असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 27,958 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

लॉकडाऊनमध्ये 15 दिवसांची वाढ

राज्यात लॉकडाऊनमध्ये 15 दिवसांनी वाढ करण्यात येणार आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीनुसार नियमात शिथिलता आणण्यासाठी त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री 1 जून रोजी जाहीर करतील. तसेच पुण्यात दर शनिवार, रविवारचा वीकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात येणार असून, त्यादिवशीही सकाळी सात ते अकरा दरम्यान अत्यावश्यक सुविधा सुरू राहतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (ता. 28) कोरोना परिस्थिती संदर्भात चा आढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. आज पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्याबाबतची नवी नियमावली जाहिर केली. पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com