
राज्यातील कोरोना नियंत्रणात। २७ जिल्ह्यांतून हद्दपार होतोय कोरोना
सोलापूर : देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाच १ ते २४ एप्रिल या काळात राज्यातील तब्बल २७ जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, लातूर, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४ जिल्ह्यांमध्ये मागील २४ दिवसांत नवीन रुग्ण वाढलेले नाहीत.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
राज्यात मार्च २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि आतापर्यंत तीन लाटा येऊन गेल्या आहेत. आतापर्यंत राज्यातील ७८ लाख ७६ हजार ८४१ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील एक लाख ४७ हजार ८३४ जणांचा कोरोनाने जीव घेतला. पण, कोविशिल्ड, कोवॅक्सिन, कोर्बोवॅक्स या प्रतिबंधित लसीमुळे कोरोनाची धार बोथट झाली आणि मृत्यूवर नियंत्रण आले. दुसरीकडे शासनाच्या निर्बंधांमुळेही कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मोठी मदत झाली. मागील २४ दिवसांत राज्यात अडीच हजार रुग्ण वाढले, पण दिलासादायक बाब म्हणजे १ ते २४ एप्रिल या काळात २० सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. १ एप्रिलला राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९३७ होती तर २४ एप्रिलला हीच सक्रिय रुग्णसंख्या ९१६ पर्यंत खाली आली आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता कमीच आहे, पण निष्काळजीपणा नको, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, उद्या (सोमवारी) यासंदर्भात टास्क फोर्सची बैठक होणार आहे.
हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील बेपत्ता ७८६ मुली-महिला अजूनही सापडल्या नाहीत
प्रतिबंधित लसीमुळे नऊ कोटी लोक सुरक्षित
राज्यातील १२ वर्षांवरील सर्वांनाच कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जात आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोर्बोवॅक्स तर १५ ते १७ वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन लस टोचली जात आहे. १८ वर्षांवरील सर्वांनाच कोविशिल्ड लस टोचली जात आहे. दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तींना संरक्षित डोस दिला जात आहे. राज्यातील १२ वर्षांवरील ११ कोटी व्यक्तींपैकी नऊ कोटी व्यक्त प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेऊन सुरक्षित झाले आहेत.
हेही वाचा: आजीच्या देखभालीस आलेल्या मुलीची कथा! १४ व्या वर्षी पहिले बाळ अन् १५व्या वर्षी पुन्हा गर्भवती
कोरोनाचा धोका टळलेले जिल्हे
एप्रिल महिन्यात मुंबई, रायगड व धुळे या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची थोडीशी वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ११ जिल्हे कोरोनमाक्त झाले आहेत. दुसरीकडे सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर, गोंदिया व गडचिरोली या १६ जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग एप्रिलमध्ये वाढलेला नाही.
Web Title: Corona Control In The State Corona Is Being Deported From 27
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..