esakal | Corona Update: राज्यात रुग्णसंख्येत मोठी घट; 6 दिवसांत 4.5 लाख कोरोनामुक्त

बोलून बातमी शोधा

Corona Updates
Corona Update: राज्यात रुग्णसंख्येत मोठी घट; 6 दिवसांत 4.5 लाख कोरोनामुक्त
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत होता. पण, सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 700 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 71 हजार 736 कोरोना रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे. सोमवारी राज्यात 524 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण कोरोना मृत्यांची संख्या 65,284 झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 6 लाख 74 हजार 770 सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज 71 हजार 736 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.

हेही वाचा: कोरोना लढ्यासाठी समितीची गरज, निलेश लंकेंसह इतर लोकप्रतिनिधी घ्या'

आज नोंद झालेल्या 524 मृत्यूंपैकी 293 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 116 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 115 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण 6,74,770 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,59,72,018 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 43,43,727 (16.72 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,78,420 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 30,398 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दिवसभरात 71,736  रुग्ण कोरोनामुक्त

आज 71,736 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 36,01,796 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.92 % एवढे झाले आहे.