esakal | Corona Updates: राज्यातील मृतांचा आकडा 1 लाखाच्या पार
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

रविवारी राज्यात 233 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे 35 मृत्यू नोंदवण्यात आले.

Corona Updates: राज्यातील मृतांचा आकडा 1 लाखाच्या पार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात रविवारी (ता.6) 233 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 1 लाखाच्या पार गेला आहे. रविवारी नोंद झालेल्या 233 मृत्यूंपैकी 167 मृत्यू हे मागील 48 तासातील, तर 66 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तसेच आठवड्यापूर्वी झालेल्या 385 मृत्यूंची नोंद कोविड पोर्टलवर रविवारी करण्यात आली. मृतांचा एकूण आकडा 1,00,130 इतका आहे. राज्यात रविवार रोजी एकूण 1,85,527 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Corona death toll in Maharashtra has crossed 1 lakh on Sunday 6th June 2021)

राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यात प्रथमच 95.5 टक्क्यांवर गेले आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाचे 14 हजार 433 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण 55 लाख 43 हजार 267 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच दिवसभरात 12,557 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 58,3,781 झाली आहे.

रविवारी राज्यात 233 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे 35 मृत्यू नोंदवण्यात आले. तर सातारा 32, मुंबई 20, अहमदनगर 20 मृत्यू झाले. मृत्यूचा दर 1.72% इतका आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,65,08,967 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,31,781 (15.97 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.