दिलासादायक! राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना
दिलासादायक! राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार

दिलासादायक! राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार

सोलापूर : राज्यावर कोरोनाचे संकट आल्यानंतर एवढी काळजी घेऊनही सोलापुरात एप्रिलमध्ये कोरोना आलाच. त्यानंतर पाहता पाहता शहर-ग्रामीणमधील रुग्णवाढ व मृत्यूदर चिंताजनक राहिला. राज्य सरकारला विशेष लक्ष घालावे लागले. केंद्रीय पथक येऊन गेले. आता तोच कोरोना परतीच्या वाटेवर असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला आहे

हेही वाचा: नेत्यांसमोर आमदारकीचा पेच! कोठे, चंदनशिवे, बेरिया, तौफिक यांचा जूनमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश

प्रतिबंधित लसीकरण सुरु होण्यापूर्वी बहुतेक जिल्ह्यांमधील मृत्यूदर चिंताजनक होता. तिसऱ्या लाटेत ही चिंता दूर झाली आणि कोरोनापासून दिलासा मिळाला. सलग १६ महिन्यांहून अधिक काळ असलेले निर्बंध शिथिल झाले. सोलापूर शहरातील कोरोना आवरतानाच ग्रामीणमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि बार्शी, पंढरपूर, करमाळा, माढा, माळशिरस या तालुक्यांनी प्रशासनाची चिंता वाढवली. दंडात्मक कारवायातून २० कोटींपर्यंत रक्कम वसूल झाली, म्हणजेच अनेकांनी त्या काळात नियमांचे उल्लंघन केले. दु:खद बाब म्हणजे सतराशे बालकांनी घरातील कर्ता गमावला. कोणाचा वडील तर कोणाची आई कोरोनाची बळी ठरली. आतापर्यंत शहर-ग्रामीणमधील दोन लाख १९ हजार ७३१ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील पाच हजार २३१ जणांचा मृत्यू झाला. आता रुग्णवाढ आणि मृत्यूदरही थांबला आहे. प्रतिबंधित लसीकरणामुळेच ते शक्य झाले आहे.

हेही वाचा: गड्या आपली मराठी शाळाच बरी! झेडपी,महापालिका शाळांचा वाढली पटसंख्या

राज्यातील कोरोनामुक्त जिल्हे

राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधून कोरोना हद्दपार झाला असून त्यात सातारा, सांगली, नंदुरबार, धुळे, जालना, लातूर, उस्मानाबाद, अकोला, बुलढाणा, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात कोरोनाचे एकूण दीड हजार रुग्ण आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये! राज्यात १३८ लाख मे.टन रेकॉर्ड ब्रेक उत्पादन

ठळक बाबी...

  • ग्रामीणमधील एक लाख ८६ हजार ६४ पैकी एक लाख ८२ हजार ३३८ जणांची कोरोनावर मात

  • शहरातील ३३ हजार ६६७ पैकी एक हजार ५०५ रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

  • ४ मार्चनंतर शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, ४ मार्च ते १७ मेपर्यंत १३ रुग्ण वाढले

  • म्युकरमायकोसिस झालेल्या ७१६ रुग्णांपैकी १०७ जणांचा मृत्यू, १३ जानेवारीपासून एकही रुग्ण नाही

  • ग्रामीणमध्ये १४ मार्चनंतर एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, दोन महिन्यांत आढळले केवळ ३५ रुग्ण

Web Title: Corona Deported From 11 Districts Of The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top