
गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये! राज्यात १३८ लाख मे.टन रेकॉर्ड ब्रेक उत्पादन
सोलापूर : राज्याच्या ऊस गाळप हंगामाने यंदा नवा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत १३८ लाख मे.टन साखर तयार झाली असून तब्बल १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले. यंदाचा गाळप हंगाम तब्बल ५९ हजार ८४० कोटींचा झाला असून निर्यात केलेल्या साखरेलाही चांगला भाव मिळाला आहे.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
देशात दरवर्षी सरासरी ३१२ लाख मे.टन साखर उत्पादित होते. पण, यंदा ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आणि गाळ हंगाम खूपच लांबला. राज्यातील विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही ऊस शिल्लक असून काही कारखान्यांचे गाळप सुरुच आहे. राज्याच्या आजवरील गाळप हंगामात २०१८-१९ मध्ये सर्वाधिक ११२ लाख मे.टन साखर तयार झाली होती. पण, यंदा १३८ लाख मे.टनाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झाले आहे. आतापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ८१ कोटी लिटर इथेनॉल तयार केले होते. परंतु, यंदाच्या हंगामात १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले आहे. केंद्र सरकारने निर्यातीसाठी यंदा काहीच सबसिडी दिली नाही. तरीही, राज्यातून मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात झाली आणि त्याला ३२ हजाराचा दर मिळाल्याने कारखान्यांना त्याचा मोठा फायदा झाला. शेतकऱ्यांनाही अठ्ठाविसशे रुपयांपासून तीन हजार १०० रुपयांपर्यंत एफआरपी मिळाली. इथेनॉलसाठी प्रतिलिटर ६० रुपयांचा दर मिळाल्याने बऱ्याच कारखान्यांनी त्याला प्राधान्य दिले. राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम घेतला.
हेही वाचा: गड्या आपली मराठी शाळाच बरी! झेडपी,महापालिका शाळांचा वाढली पटसंख्या
गाळप हंगामाची वैशिष्टे...
- १९७ साखर कारखान्यांनी पहिल्यांदाच तयार केली १३८ लाख मे.टन साखर
- यंदाच्या साखर उत्पादनातून मिळाले ४३ हजार ८४० कोटी रुपये
- रेक्टिफाइड स्पिरिटमधून कारखान्यांना मिळाले चार हजार कोटींचे उत्पन्न
- को-जनरेशन व इथेनॉलमधून मिळाले १२ हजार कोटी रुपये
- केंद्राच्या निर्यात अनुदानाशिवाय इंडोनेशिया, मध्य पूर्व आशियात ९५ लाख मे.टन साखर निर्यात
हेही वाचा: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई
पुढील हंगाम ऑक्टोबरमध्ये
मागील दोन-तीन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने राज्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा त्यात आणखी वाढ झाली आहे. १६ महिन्यांहून अधिक काळ होऊनही कारखाने गाळपासाठी ऊस नेत नसल्याने बऱ्याच उत्पादक शेतकऱ्यांनी अख्खे फड पेटवून दिले. अशी परिस्थिती पुढील हंगामात होऊ नये म्हणून आगामी गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे नियोजन आतापासूनच केले जात आहे.
Web Title: The Next Threshing Season Is In October Record Break Production Of 138 Lakh Mt Of Sugar In The
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..