esakal | थैमान वाढतेय! राज्यात 'या' जिल्ह्यातील कोरोना वाढीचा वेग सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

थैमान वाढतेय! राज्यात 'या' जिल्ह्यातील कोरोना वाढीचा वेग सर्वाधिक

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाची साथ कमालीच्या वेगाने वाढत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील नऊपैकी सहा महापालिका असलेल्या या जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण 31 टक्क्यांवर गेले आहे.

थैमान वाढतेय! राज्यात 'या' जिल्ह्यातील कोरोना वाढीचा वेग सर्वाधिक

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

ठाणे ः ठाणे जिल्ह्यातील कोरोनाची साथ कमालीच्या वेगाने वाढत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील नऊपैकी सहा महापालिका असलेल्या या जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण 31 टक्क्यांवर गेले आहे. याचाच अर्थ चाचणी होत असलेल्या तिघातील एकास कोरोनाची बाधा झाल्याचे आढळत आहे. एका महिन्यात हे प्रमाण अकरा टक्क्यांनी वाढले आहे. 

खाजगी शाळांचं सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष, पालकांनाच दिली धमकी! वाचा काय आहे प्रकरण

ठाण्यात रुग्ण पॉझिटीव्ह ठरण्याचे प्रमाण मुंबईपेक्षा सहा टक्क्यांनी जास्त आहे, तर महाराष्ट्रातील प्रमाणापेक्षा बारा टक्रक्यांनी. देशात हीच टक्केवारी 6.6 टक्के आहे, तर महाराष्ट्रात 19 टक्के. त्यावरुन ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण यंत्रणेची किती चिंता वाढवत असेल हे लक्षात येते. गेल्या आठवड्यात हे प्रमाण मोठ्या वाढल्यानेच कठोर उपाय अमलात आणले जात आहे. ठाण्यात रुग्ण पॉझिटीव्ह ठरण्याचे प्रमाण 27 मे रोजी 20 टक्के होते, ते आता 28 जूनपर्यंत 31 टक्क्यांवर गेले आहे. यापूर्वी राज्यात मुंबईची 25 टक्केवारी सर्वाधिक होती, तर ठाणे 20 टक्क्यासह दुसरे होते. 

ठाणेच नव्हे तर रायगड आणि पालघर या मुंबई जवळच्या जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग प्रचंड आहे. वसई विरार महापालिका असलेल्या पालघरचे प्रमाण 16 टक्क्यावरुन 29 टक्के तर रायगडचे प्रमाण 15 वरुन 24 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या जिल्ह्यात पनवेल महापालिकेचा समावेश आहे.   
मुंबई महानगरातील ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल या महापालिकेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 31 मे ते 30 जून या कालावमधीत मुंबईतील रुग्णात 94 टक्क्यांनी वाढ झाली, तर ठाण्यात 166 टक्के, पनवेलमध्ये 364 टक्के, मीरा भाईंदरमध्ये 414 टक्के तर कल्याण डोंबिवलीत 469 टक्के. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संजय गांधी उद्यान मॉर्निंग वॉकसाठी खुले करा; वाचा कोणी केली ही मागणी 

अनलॉक सुरु झाल्यावर रुग्णांची सख्या वाढली आहे. मुंबईत जाणाऱ्या नोकरदारांचे प्रमाण वाढल्यावर रुग्ण वाढले असल्याचे आधिकाऱ्यांचे मत आहे. त्याचबरोबर चाचणीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पाचही महापालिकात चाचण्यांचे प्रमाण दुपटीने वाढवण्यात आले.