esakal | Corona : गरबा बंदीमुळे कलाकारांवर संक्रांत; कोरोनामुळे हतबल, दिवाळी कशी करणार?
sakal

बोलून बातमी शोधा

 artists

गरबा बंदीमुळे कलाकारांवर संक्रांत; कोरोनामुळे हतबल, दिवाळी कशी करणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर : यंदाही सांस्कृतिक क्षेत्राला (Cultural field) कोरोना महामारीचा (corona pandemic) फटका बसला आहे. मागच्या दीड वर्षापासून लाखो कलावंतांवर उपासमारीची ( Artist starvation) वेळ आली आहे. नवरात्र उत्सवात (Navratri festival) ऑर्केस्ट्रा कलाकार व साऊंड व्यावसायिकांना मोठी मागणी असते; मात्र याही वर्षी कोरोना भीतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (mva government) सार्वजनिक गरब्याला परवानगी (No Graba) नाकारली असल्याने यंदाही या कलाकारांवर संक्रांत कायम आहे. त्यामुळे येणारी दिवाळी साजरी कशी करायची, असा प्रश्न या कलाकारांसमोर उभा आहे.

हेही वाचा: मुंबई: प्रभागांच्या सीमा बदलणार? कच्चा आराखडा आठवडाभरात स्पष्ट होणार

राज्य सरकारने नवरात्रीतील रासगरबा, दांडियांचे आयोजन यंदाही रद्द केल्याने सरकारच्या या निर्णयाविरुद्ध दांडिया प्रेमींसह वाद्यवृंद, ऑर्केस्ट्रा कलाकारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनमध्ये मराठी, हिंदी वाद्यवृंदात १२ हजारांपेक्षा अधिक कलाकार आहेत. यामध्ये गायक, गायिका, वादक, निवेदक, नर्तक, कव्वाल, लोकशाहीर, गोंधळी, मिमिक्री आर्टिस्ट, लाईट, साऊंड तंत्रज्ञ आणि निर्माते, बॅकस्टेज कामगार यांचा समावेश आहे. ते कला पेश करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तसेच ते शासकीय कार्यक्रम, पोलिस वेल्फेअर, सिनेमा अशा विविध कार्यक्रमांत आपली कला सादर करतात. सध्या लॉकडाऊन शिथिल झाले असले, तरी कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे कलाकार अडचणीत आहेत.

"नवरात्र उत्सवामध्ये साऊंड सिस्टीमलाही मोठी मागणी असते. नऊ दिवस रोजगार प्राप्त होतो; मात्र या वेळी कोणतेही कार्यक्रम नसल्यामुळे साऊंड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन वर्षे होत आली आहेत काम नाही. सरकारकडे हीच विनंती आहे, की लवकरात लवकर काही तरी मार्ग काढून आमच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवावा."
- राजेश वाघमारे, साऊंड व्यावसायिक

"तीस-पस्तीस वर्षे आम्ही काम करतो, परंतु एवढी वाईट परिस्थिती केव्हा पाहिली नाही. शेतकऱ्यांनी जो मार्ग अवलंबतो तो मार्ग आम्हाला अवलंबायचा नाही, परंतु जर अशीच परिस्थिती राहिली, तर कदाचित त्या दिशेने एक पाऊल पडण्याची दाट शक्यता आहे. एकच विनंती आहे, की दिवाळीच्या आधी कार्यक्रमाला परवानगी दिली तर निदान एक तरी उजेड देणारा दिवा आमच्या कलावंतांच्या घरात लागेल."
- अशोक निकाळजे, निवेदक

loading image
go to top