esakal | मुंबई: प्रभागांच्या सीमा बदलणार? कच्चा आराखडा आठवडाभरात स्पष्ट होणार | BMC Election
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

मुंबई: प्रभागांच्या सीमा बदलणार? कच्चा आराखडा आठवडाभरात स्पष्ट होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्या (BMC) फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी (Election) प्रभागांच्या सीमा (ward boundary) बदलणार का, हे आठवडाभरात स्पष्ट होणार आहे. सीमांकनाचा कच्चा आराखडा (Raw Layout) या आठवड्यापर्यंत अंतिम होणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांना (bmc authorities) सांगितले.

हेही वाचा: धोकादायक इमारत सोडण्यास रहिवाशांचा विरोध; म्हाडा दोन इमारती पाडणार

महापालिका निवडणुकांसाठी प्रभागांची पुनर्रचना करण्यात येत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ही प्रभाग रचना असेल; मात्र प्रभागांची संख्या २२७ पेक्षा कमी होणार नाही आणि वाढणारही नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. काही प्रभागातील बदललेली भौगोलिक परिस्थिती, तसेच पुनर्विकास आणि विकासामुळे मतदारांचे झालेल्या स्थलांतरामुळे प्रभागांच्या रचनेत काही प्रमाणात बदल होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे पालिका निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

२०१७ च्या निवडणुकीत शहर विभागातील प्रभागांची संख्या कमी झाली होती, तर पश्‍चिम उपनगरातील प्रभागांची संख्या वाढली होती. आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी असेल, हे येत्या आठवडाभरात निश्‍चित होऊ शकेल, असेही सांगण्यात आले. प्रत्येक प्रभागात ५४ हजार रहिवाशी (मतदार नव्हे) असतील, अशा पद्धतीने ही रचना करण्यात येत आहे. यात १० टक्के कमी-जास्त लोकसंख्या तेथील स्थानिक परिस्थितीनुसार असू शकेल, असेही सांगण्यात आले.

हेही वाचा: BMC : उद्याने, मैदानांची देखभालही कमी खर्चात?

प्रलंबित प्रकरणे निकालात काढा!

पालिकेच्या निवडणुकीबाबत, नगरसेवकांची पात्रता, तसेच २०१७ च्या प्रभाग रचनेबाबत काही प्रकरणे विविध न्यायालयात प्रलंबित आहेत. ही प्रकरणे लवकरात लवकरच निकालात काढण्याची विनंतीही पालिकेमार्फत न्यायालयाकडे करण्यात येणार आहे.

४० प्रभागांचा वाद

२०१७ च्या निवडणुकीसाठी ४० प्रभागांमध्ये फेरफार करताना त्यांना नियमांचे पालन केले नव्हते, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. तसेच या प्रभागांचा फेररचनेत प्रामुख्याने विचार करण्याची विनंतीही पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी निवडणूक आयोगासह पालिका प्रशासनाकडे केली आहे.

"प्रभागातील बदललेल्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून आठवडाभरात कच्चा आराखडा तयार होईल."
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

loading image
go to top