esakal | आरोग्यमंत्र्यांनी दिला 'हा' मूलमंत्र! कोरोनाचा संसर्ग अन्‌ मृत्यूदर होईल कमी
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh-Tope-

आरोग्यमंत्री म्हणाले... 

 • सोलापुरातील मृत्यूदर हा 11 टक्‍के असून ते प्रमाण राज्यात सर्वाधिक 
 • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्‍के; रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 22 दिवसांवर 
 • सोलापुरात कोरोनामुळे 17 टक्‍के तर अन्य आजारांनी 83 टक्‍के लोकांचा मृत्यू 
 • शून्य ते 48 तासांत दाखल होऊन 80 लोकांचा मृत्यू झाला; घरोघरी जाऊन होणार पुन्हा तपासणी 
 • विडी, हातमाग, यंत्रमाग कामगारांच्या छातीचा काढला जाणार एक्‍स-रे; कोरोनाशिवाय अन्य आजारांवर होणार तत्काळ उपचार 
 • लक्षणे असलेल्या अथवा संशयित व्यक्‍तींसाठी अलगीकरण कक्षात केली जाणार वाढ; आयुक्‍तांच्या जोडीला मिळणार दोन उपायुक्‍त 
 • आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांचे काम चांगले; घरोघरी तपासणीसाठी सरकार देईल आणखी एक अधिकारी 
 • मॉड्यूलर आयसीयुची व्यवस्था केली जाणार; निधी व साधनसामग्रीची उपलब्धता; जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍तांनी घ्यावा निर्णय 

आरोग्यमंत्र्यांनी दिला 'हा' मूलमंत्र! कोरोनाचा संसर्ग अन्‌ मृत्यूदर होईल कमी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूदर वाढण्यात सोलापूर राज्यात अव्वल असून आता विडी, हातमाग व यंत्रमाग कामगार वस्तीतील नागरिकांच्या छातीचा सिटी स्कॅन व एक्‍स-रे काढण्यावर भर दिला जाणार आहे. तर अलगीकरण कक्ष वाढविण्यावरही भर दिला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. जेणेकरुन रुग्ण लवकर सापडतील आणि संसर्ग व मृत्यू कमी होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. 

सोलापूरसह राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आणि रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील आयसीयु बेडची संख्या वाढविली जाणार असून अलगीकरण कक्ष वाढविण्यासाठी शासकीय इमारती अथवा शाळा, वस्तीगृहांच्या इमारतीचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण खूपच कमी असून मधुमेह, रक्‍तदाब, ह्दय, किडनी, मेंदूसंबंधी पूर्वीच्या आजाराने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तरीही इलायझा ऍन्टी बॉडी टेस्टवर भर दिला जाणार असून उपजिल्हा रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दरम्यान, निमोनियासह अन्य आजार वेळेत समजावेत आणि त्यांच्यावर उपचार करता यावेत, या हेतूने पोर्टेबल मशिनद्वारे छातीचे एक्‍स-रे काढले जातील. सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयु बेडची उपलब्धता वाढवली जाणार असून सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या सर्व बेडचा वापर करावा. ज्या हॉस्पिटलमधून कोरोनाचा संसर्ग वाढला, त्याठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करावी, सार्वजनिक शौचालयाच्याच्या ठिकाणीही जंतूनाशक फवारणी करावी, अशा सूचनाही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. 

आरोग्यमंत्री म्हणाले... 

 • सोलापुरातील मृत्यूदर हा 11 टक्‍के असून ते प्रमाण राज्यात सर्वाधिक 
 • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्‍के; रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 22 दिवसांवर 
 • सोलापुरात कोरोनामुळे 17 टक्‍के तर अन्य आजारांनी 83 टक्‍के लोकांचा मृत्यू 
 • शून्य ते 48 तासांत दाखल होऊन 80 लोकांचा मृत्यू झाला; घरोघरी जाऊन होणार पुन्हा तपासणी 
 • विडी, हातमाग, यंत्रमाग कामगारांच्या छातीचा काढला जाणार एक्‍स-रे; कोरोनाशिवाय अन्य आजारांवर होणार तत्काळ उपचार 
 • लक्षणे असलेल्या अथवा संशयित व्यक्‍तींसाठी अलगीकरण कक्षात केली जाणार वाढ; आयुक्‍तांच्या जोडीला मिळणार दोन उपायुक्‍त 
 • आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांचे काम चांगले; घरोघरी तपासणीसाठी सरकार देईल आणखी एक अधिकारी 
 • मॉड्यूलर आयसीयुची व्यवस्था केली जाणार; निधी व साधनसामग्रीची उपलब्धता; जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍तांनी घ्यावा निर्णय 

खासगी हॉस्पिटलवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक 
सोलापूरसह राज्यातील सर्व खासगी हॉस्पिटल सुरु ठेवण्याचे निर्देश वारंवार देण्यात आले आहेत. आता पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याची शक्‍यता असल्याने राज्य सरकारच्या सूचनांचे पालन खासगी दवाखान्यांनी करायलाच हवे. अन्यथा बॉम्बे नर्सिंग ऍक्‍टनुसार संबंधित हॉस्पिटलवर कारवाई केली जाईल. तसेच दवाखान्याचा आणि संबंधित डॉक्‍टरांचा परवानाही रद्द केला जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. दरम्यान, खासगी दवाखाने सुरु आहेत की नाहीत, त्याठिकाणी रुग्णांना दाखल करुन घेतले जाते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्‍ती करावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या. 

loading image