esakal | एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पास लागेल का?
sakal

बोलून बातमी शोधा

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पास लागेल का? जाणून घ्या

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पास लागेल का? जाणून घ्या

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनासदृश्य कठोर निर्बंध बुधवारपासून लागू करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून लोकांना नव्या कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे, त्यामुळे संचारबदी असणार आहे. मागील वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या संचारावर कडक निर्बंध होते. पासशिवाय लोकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेशास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे आता लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधामध्ये सुद्धा हा नियम लागू असेल का, असा प्रश्न विचारला जात होता. यावर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. यावेळी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पासची आवश्यकता नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: शिक्षकांना पुन्हा कोरोनाची ड्यूटी ! शहरातील शिक्षकांना करावे लागणार को-मॉर्बिडचे सर्व्हेक्षण

अत्यावश्यक कारणासाठी वैयक्तीक गाडीचा वापर करता येईल. शिवाय आपत्कालीन कामासाठी कोणत्याही पासची गरज असणार नाही. मागच्या वेळेस पासची सिस्टिम होती, तसेच त्याची तपासणी काटेकोरपणे होत होती. पण, यावेळी पासची कोणतीही गरज लागणार नाही. अत्यावश्यक कामासाठी कोणी बाहेर पडत असेल, तर त्याला कोणताही त्रास होणार नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पासची गरज नाही. राज्यात कलम 144 लागू आहे, पण कोणी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले असेल, तर अशांना पोलिस विनाकारण त्रास देणार नाहीत, असं संजय पांडे म्हणाले आहेत.