कोरोना काळातील 15 टक्के फी कपातीची तातडीने अंमलबजावणी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school

कोरोना काळातील 15 टक्के फी कपातीची तातडीने अंमलबजावणी करा

मुंबई : कोरोना काळात कमी करण्यात आलेल्या 15 टक्के फी कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड विभागातील शाळांसाठी हे आदेशदेण्यात आले आहे. शिक्षक उपसंचालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार 15 टक्के फी कपातीची अंमलबजावणी होणार आहे.

कोविड काळामध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये 15 टक्के फी कापातीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, त्या विरोधात काही शिक्षण संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती.त्यामुळे अनेक शाळांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी यासाठी मुंबईचे उपसंचालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी परिपत्रक जारी केले आहे.

यामध्ये ज्यांनी फीस भरली आहे त्यांना पुढील वर्षी त्याचं समायोजन करता येईल असं या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. फी कपातीचे आदेश मागील वर्षीसाठी होती आणि त्याची अमलबजावणी तातडीने करावी अशा प्रकारचे आदेश आता देण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड विभागातील शाळांसाठी हे आदेश ण्यात आले आहे.

Web Title: Corona Pandemic 15 Fee Reduction Fallow Immediate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :schoolSchool fees
go to top