

मुंबई : सध्या मुंबईसह (Mumbai) राज्यभरात कोरोनाचा फारसा (corona pandemic) उद्रेक नसल्यामुळे शाळा सुरु करण्यास (school starts) टास्क फोर्सने परवानगी (task force permission) दिली आहे. मात्र पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा 1 डिसेंबर पासून सुरू झाल्यावर कोरोना नियमावलीचे (corona rules) पालन करणे गरजेचे असल्याचे बालरोग टास्क फोर्स ने स्पष्ट केले आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवणे, एका बेंचवर एकच विद्यार्थी,आणि विद्यार्थी एकत्र येणाऱ्या खेळांवर निर्बंध,अशा सूचना मुंबईसह राज्यातील शाळा प्रशासनाला केल्याचे बालरोग तज्ज्ञ व टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू (dr suhas prabhu) यांनी सांगितले.
राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याने मुंबईसह राज्यात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु झाले.आता प्राथमिक वर्ग देखील सुरू करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेत पालिका आणि टास्क फोर्स यांची बैठक झाली. या बैठकीत टास्क फोर्सकडून महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. आता कोरोना नियंत्रात आला असला तरी युरोप, रशिया व अमेरिका या देशांत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. तर भारतात तिसऱ्या लाटेचीही शक्यता नाही तर मात्र कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या त्यामुळे आता शाळा सुरु करण्यास काहीच हरकत नसल्याचे महिनाभरापूर्वीच राज्य सरकारला सुचवले त्यानंतरच राज्य सरकारने शाळा सुरू करण्याची घोषणा केली.
लहान मुलांना कोरोनाची लागण होईल, असे म्हणणे योग्य नसून आयसीएमआरच्या सूचनेचा अभ्यास करुनच शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारला सूचना केल्याचे देखील ते म्हणाले आहे.तर कोरोनाच्या लढ्यात सर्वाधिक त्रास वयोवृद्धांना असून लहानमुलांना धोका कमी असल्याचं राज्यातील आकडेवारी वरून स्पष्ठ होत असल्याचं ही ते म्हणाले आहेत.मुंबईत आता पर्यंत केवळ 40 टक्केच मुंबईकरांनी दुसरा डोस घेतला आहे 60 टक्के मुंबईकर अजून बाकी आहे. त्यामुळे दुसरा डोस न घेतलेले घरीच बसतात का असा सवाल ही प्रभू यांनी उपस्थित केला.
शाळा सुरू होत असताना कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. शाळा सुरु होण्याआधी शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. शाळा सुरु झाल्यावर सोशल डिस्टन्सिंगसह तोंडावर मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे या नियमांचे पालन,दोन विद्यार्थ्यांमध्ये एक मीटरचे अंतर, एका बेंचवर एक विद्यार्थी, प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिगची व्यवस्था या गोष्टींचे पालन करावे, अशा सूचना शाळा प्रशासनाला केल्याचे प्रभू यांनी सांगितले.
एक वर्षांखालील वर्षभरातील मृत्यू
लहान मुली - 60
मुले - 92
एकूण - 152
एक ते 10 वर्षापर्यंतचे वर्षभरातील मृत्यू
लहान मुली - 75
लहान मुले - 126
एकूण मृत्यू - 201
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.