
कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा,विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.
कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा म्हणून...
मुंबई - कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा,विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी सरकारमार्फत उपाय योजना करण्यात आल्या आहेत. टोपे यांनी राष्ट्रीय ऑक्सिजन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून राज्याला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी सूचना दिल्या. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलिंडर आणि दोनशे जम्बो सिलिंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचित केले.
राज्यातील ऑक्सिजन सिलिंडर
- 400 टन ऑक्सिजनची गरज
- 1,081 टन उत्पादन क्षमता
- 17,753 जम्बो सिलिंडर
- 1,547 बी टाईप सिलिंडर
- 230 ड्युरा सिलिंडर
आरोग्यमंत्री म्हणाले...
- जिल्हा आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रात आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेड उपलब्ध करावेत.
- ऑक्सिजनची प्रतिदिन गरज लक्षात घेणे
- ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर समिती
- जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहतील.
- शंभर किंवा त्याहून अधिक खाटा असलेल्या सार्वजनिक रुग्णालयांनी क्रायो ऑक्सिजन टँक स्थापन करावेत.
Edited By - Prashant Patil
Web Title: Corona Patients Receive Timely Oxygen Treatment Rajesh Tope
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..