Maharashtra Corona Restriction | मोठी बातमी! महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध शिथील, निम्म राज्य निर्बंधमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Covid

मोठी बातमी! महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध शिथील, निम्म राज्य निर्बंधमुक्त

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मागील महिन्याभरात मोठी घट झाल्याने सार्वजनिक निर्बंध लकवरच शिथील होणार असल्याची माहिती राज्य सरकारमार्फत देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेली जमावबंदी आणि मोठ्या कार्यक्रमांवरील मर्यादा यामुळे संपणार आहेत. तुर्तास महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Corona Restrictions)

हेही वाचा: महाराष्ट्रात आजपासून निर्बंध शिथिल; जाणून घ्या सुधारित आदेश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत निर्बंध घालण्याचे आदेश स्थानिक पातळीवर देण्यात आले होते. यातून विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी कोरोना नियमावली लागू होती. कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार त्यांच्या त्या त्या ठिकाणी निर्बंध लादण्यात आले होते. (Maharashtra unlock)

मात्र, आता राज्यातील बुधवारपासून पुणे, मुंबई आणि नागपूरसह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. राज्यात सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना दिलासा मिळणार असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. या नव्या नियमांमुळे ठराविक जिल्ह्यांतील उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे.इ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मुभा दिली जाईल.

हेही वाचा: राजधानी दिल्ली निर्बंधमुक्त; महाराष्ट्रात कधी होणार घोषणा?

यापूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून उद्याने, पर्यटन स्थळे, वन्य सफारी, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, चित्रपटगृह, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली होती. पन्नास टक्के क्षमतेने ही आस्थापनं सुरू होती. मात्र गेल्या महिनाभरात राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे बुधवारपासून नवे नियम लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे. या आठवड्यात राज्यात आतापर्यंत सर्वात कमी म्हणजेच ४०७ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या सात हजारांच्या घरात अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

'या' जिल्ह्यांना मुभा

मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सांगली, पालघर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, भंडारा, वर्धा, कोल्हापूर, ठाणे, गोंदिया या जिल्ह्यांतील लसीकरण ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या ठिकाणचे निर्बंध मागे घेण्यात येतील. या जिल्ह्यात दोन लस घेतलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे लवकरच या जिल्ह्यांना तत्काळ दिलासा मिळणार आहे. मात्र एखाद्या जिल्ह्यात अजूनही अधिक प्रमाणात करोनाबाधित आढळत असल्यास त्या ठिकाणी निर्बंध कायम ठेवण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याची माहिती मिळते.

Web Title: Corona Restrictions Will Be Relaxed In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top