
महाराष्ट्रात आजपासून निर्बंध शिथिल; जाणून घ्या सुधारित आदेश
मुंबई : कोविड नियमावलीअंतर्गत १ फेब्रुवारीपासून अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर आता कोणतेही निर्बंध लागू नसतील. लसीकरण पूर्ण झालेल्यांना पर्यटनस्थळावर प्रवेश मिळणार असून जलतरण तलावही आता ५० टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. स्थानिक परिस्थिती लक्षात घेता रात्रीच्या संचारबंदीबद्दलचे नियमही शिथिल करण्याचे अधिकार तेथील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लग्नसमारंभासाठी आता २०० जणांना निमंत्रण देता येणार आहे. (Maharashtra govt announces relaxation in COVID restrictions)
हेही वाचा: कोरोना मृतांच्या वारसांना मदत : अर्जासाठी ऑनलाईनची सक्ती नको- हायकोर्ट
राज्यात कोविड रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर ठाकरे सरकारने १० जानेवारीपासून निर्बंध जारी केले होते. आता मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट आता उतरणीला लागली असून सोमवारी शहरात एक हजाराहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली. तर पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मागील आठ दिवसांपासून झपाट्याने कमी झाली. आठ दिवसांपूर्वी ९३ हजार ६४२ वर पोचलेली ही संख्या सोमवारी साठ हजारांच्या आत आली आहे. राज्यातील अन्य शहरांमध्येही हेच चित्र आहे. (Maharashtra Covid Update)
हेही वाचा: 'NeoCov' चा धोका किती? टास्क फोर्सचं मुंबईकरांना आवाहन
कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा निर्बंध शिथिल केले आहेत. 1 फेब्रुवारी 2022 पासून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारित आदेश लागू होणार आहेत. राज्यातील राष्ट्रीय उद्याने, सफारी नियमित वेळेनुसार सुरू होणार असून ज्या पर्यटनस्थळांवर तिकीट आहे ती देखील सुरू होणार आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सुधारित आदेशातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे... (Maharashtra reopen)
१. मुंबई, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, कोल्हापूर आणि चंद्रपूर या ११ जिल्ह्यांचा अ वर्गात समावेश. १८ वर्षांवरील ९० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस आणि ७० टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा अ वर्गात समावेश करण्यात आला आहे.
२. कोरोनाची स्थिती पाहून दर आठवड्याला ही यादी अपडेट केली जाईल. या यादीचे निकषही परिस्थितीनुसार बदलले जातील.
३. अ वर्गातील जिल्ह्यांना काय दिलासा -
> समुद्रकिनारे, उद्याने आणि पार्क हे स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरू राहतील.
> तरणतलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने सुरू होणार
Web Title: Maharashtra Government Announces Relaxation In Covid Restrictions Parks Tourist Spots To
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..