esakal | राज्यातील मृत्यूदरात घट; 2.48 टक्क्यांवरुन थेट 0.66 वर घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

राज्यातील मृत्यूदरात घट; 2.48 टक्क्यांवरुन थेट 0.66 वर घसरण

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यात फेब्रुवारी महिन्यांपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (corona third wave) सुरुवात झाली. राज्याच्या आरोग्य विभागाने (health department) दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात (April) सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण (huge corona patient) आणि त्यातून झालेल्या मृत्यूंचे प्रमाण ही जास्त होते. मात्र, गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील मृत्यूदरामध्ये (Corona deaths decreases) घट नोंदवण्यात आली आहे. सध्या राज्याच्या मृत्यूदर 1 टक्क्यांच्या खाली असून तो थेट 0.66 टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचा: राज्यातील ३ लाख युवक-युवतींना मिळणार 'या' क्षेत्रातील प्रशिक्षण, मलिक म्हणाले...

फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर आधी दररोज 4, 690 रुग्ण सापडत होते. तेव्हा मृत्यू 1,464 मृत्यू नोंदवण्यात आले. तर, मृत्यू दर 1 टक्क्यांच्यावर 1.11 टक्के नोंदवण्यात आला. गेल्या 8 महिन्यांपैकी एप्रिल, मे आणि जून या महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. एप्रिल 2021 या महिन्यात 17 लाख 89 हजार 406 रुग्ण सापडले. तर, दर दिवशी सरासरी 60 हजार नवीन रुग्ण सापडत होते. त्यातून 29,613 मृत्यू नोंदले गेले आणि राज्याचा मृत्यूदर 1.65 टक्क्यांवर पोहोचला.  मे आणि जूनमध्ये कोरोनाची लाट काहीशी ओसरली आणि रुग्णसंख्या कमी झाली पण मृत्यूदर वाढून 2.48 टक्क्यांवर पोहोचला. जो जून मध्येही सारखाच मृत्यूदर होता.

 सध्या कोरोनाची लाट नियंत्रणात आली असून ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला दरदिवशी सरासरी पाच ते चार हजारांच्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दर दिवशी अनुक्रमे 5,124 आणि सप्टेंबर महिन्यात 4,310 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, एप्रिल, मे आणि जून या तिन्ही महिन्यात राज्याचा मृत्यू दर जास्त असल्याचे राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आता त्यात घट झाली असून रुग्णसंख्या कमी झाल्याने मृत्यूदरात ही कमी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

6 महिन्यांचा मृत्यूदर

महिना मृत्यूदर

एप्रिल 1.65 टक्के

मे 2.48 टक्के

जून 2.48 टक्के

जुलै 1.64 टक्के

ऑगस्ट 1.65 टक्के

सप्टेंबर (3 सप्टेंबरपर्यंत) 0.66 टक्के

6 महिन्यांतील मृत्यू (सरासरी)

एप्रिल 29,613

मे 28,673

जून 7,844

जुलै 3,942

ऑगस्ट 2,626

सप्टेंबर (3 सप्टेंबरपर्यंत) 113

loading image
go to top