Corona Update : राज्यात आज 2015 कोरोना रूग्णांची नोंद, सहा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update 2015 corona positive patients  reported  today in state check details

Corona Update : राज्यात आज 2015 कोरोना रूग्णांची नोंद, सहा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात आज पुन्हा 2,015 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत तर आज एकूण 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्यात आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत.

कोरोना मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला असून तब्बल 78,71,507 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.97 टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यात आजपर्यंत ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सच्या रुग्णांची संख्या 192 वर पोहोचली आहे. राज्यात बी ए. 4 आणि बी ए. 5 व्हेरीयंटचे 30 रुग्ण तर बी ए.2.75 चे 18 रुग्ण आढळले. दरम्यान राज्यात एकूण 14692 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 5075 इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1817 सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा: "ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम", जूना दाखला देत निलेश राणेंची बोचरी टीका

Web Title: Corona Update 2015 Corona Positive Patients Reported Today In State Check Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus