esakal | Corona Update: राज्यात 8,010 नवे रुग्ण, रिकव्हरी रेटही वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update: राज्यात 8,010 नवे रुग्ण, रिकव्हरी रेटही वाढला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 8,010 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 61,89,257 झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,07,205 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. (Corona Update 8010 new patients in maharashtra recovery rate increased aau85)

राज्यात नियंत्रणात आलेला मृत्यूचा आकडा आज पुन्हा वाढला. राज्यात आज 170 रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1,26,560 वर पोहोचला आहे. आज सर्वाधिक 51 मृत्यू ठाणे मंडळात नोंदवण्यात आले. तर पुणे 49, औरंगाबाद 10, नाशिक 5, अकोला 5, नागपूर 3 व लातूर मंडळात 2 मृत्यू नोंदवले गेले. मृत्यूचा दर 2.04 टक्के इतका झाला आहे.

हेही वाचा: ...तर राज्य कर्मचारी संपाचं हत्यार उपसणार; कर्मचारी संघटनेचा इशारा

आज दिवसभरात 7,391 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 59,52,192 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा: JEE Mains 2021 : जेईईच्या चौथ्या सत्राच्या तारखा ढकलल्या पुढे

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,48,24,211 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,89,257 (13.81 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,81,266 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,471 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image