esakal | Corona Update : राज्यात दिवसभरात ८,५३५ नव्या रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

Corona Update : राज्यात दिवसभरात ८,५३५ नव्या रुग्णांची नोंद

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी अद्याप चिंतामुक्त होण्यासारखी परिस्थिती नाही. कारण वेगानं नवी रुग्णसंख्या वाढत नसली तरी ती वेगानं कमीही होताना दिसत नाही. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही आठ हजार ते दहा हजार दरम्यानच राहिली आहे. आज कालच्या तुलनेत पुन्हा रुग्णसंख्येत किंचितशी वाढ झाली आहे. त्यानुसार आज दिवसभरात राज्यात ८,५३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर राज्याचा रिकव्हरी रेट ९६.०२ टक्क्यांवर पोहोचला. (Corona Update 8535 new patients registered in Maharashtra)

आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ८,५३५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ६,०१३ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या ५९,१२,४७९ इतकी झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात १५६ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं राज्यात एकूण १,२५,८७८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच राज्यात सध्या १,१६,१६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईतील कोरोनाची आकडेवारी

मुंबई शहरात दिवसभरात ५५५ नव्या रुग्णांची वाढ झाली. तर ६६६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे शहराचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या इथे ७,३५४ सक्रिय रुग्ण आहेत. तर बरे झालेले एकूण रुग्ण ७,०२,३७६ इतके आहेत. दरम्यान, मुंबईतला रुग्ण दुप्पटीचा दर हा ९२८ दिवस इतका असून रुग्ण वाढीचा दर ०.०७ टक्के झाला आहे.

पुण्यातील कोरोनाची आकडेवारी

पुण्यात दिवसभरात २८७ नवे रुग्ण आढळून आले. तर २२८ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच ५ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच ३,०८५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर २२७ रुग्णांची स्थिती गंभीर आहे. पुणे शहरात आजवर ४,७०,०९७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ८,६५२ मृत्यू झाले आहेत.

loading image