esakal | Corona Update : राज्याला दिलासा, कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट!
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

राज्याला दिलासा, कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट!

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाच्या दृष्टीनं राज्यासाठी सोमवारचा दिवस दिलासादायक ठरला. कारण कालच्या तुलनेत सुमारे हजाराने कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट नोंदवली गेली. गेल्या चोवीस तासात राज्यात ७,६०३ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली. (corona update big drop in number of corona patients in maharashtra aau85)

आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ७,६०३ नवे रुग्ण आढळून आले. तर १५,२७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण बरे झाल्यानं राज्यासाठी सोमवार दिलासादायक ठरला. तसेच दिवसभरात ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात एकूण ६१,६५,४०२ रुग्ण आढळून आले तर आजवर ५९,२७,७५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आजवर १,२६,०२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या १,०८,३४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईतील कोरोनाची आकडेवारी

मुंबईत संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, चोवीस तासात ४७८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ७०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबई शहरात ७,१२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरात आजवर ७,०३,०७७ रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईतील रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतला रुग्ण दुप्पटीचा दर ९२६ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के आहे.

पुण्यातील कोरोनाची आकडेवारी

पुणे शहरात दिवसभरात ४,८०२ कोरोना चाचण्या पार पडल्या. यातून १८९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच दिवसभरात २७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात सध्या २,९९१ रुग्णांवर उपचार सुरु असून यांपैकी २२५ रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

loading image