esakal | Corona Update: कोरोनाची आकडेवारी लॉकडाऊनची भीती वाढवणारी
sakal

बोलून बातमी शोधा

corona

पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केलं.

Corona Update: कोरोनाची आकडेवारी लॉकडाऊनची भीती वाढवणारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भावाने डोकं वर काढलं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर संसर्गामध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती आणि आजही ही शक्यता आहे. राज्यामध्ये पुणे आणि मुंबई शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या टिपेला पोहोचली आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरामध्ये कोरोनाचे नवे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

आज दिवसभरात 47,827 नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात आज 202 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 29,04,076 वर पोहोचली आहे. काल राज्यात 43,183 नवे रुग्ण आढळले होते. तर काल 249 रुग्णांचा मृत्यू झाला होता. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज तब्बल चार हजारांनी वाढली आहे. 

हेही वाचा - LIVE: मला खलनायक ठरवलं, तरी मी माझी जबाबदारी पार पडणार - उद्धव ठाकरे

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केलं. मात्र, या संबोधनात उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली नाही. मात्र, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्ताच काही वक्तव्य करणार नसल्याचं म्हटलं आहे. पण, परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल. तसेच भविष्यात लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही, असं सूचक वक्तव्य केलंय. तसेच या संबोधनात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा - आरोग्य व्यवस्था वाढवा म्हणणाऱ्या महिंद्रांना मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

पुण्यात हे आहेत निर्बंध

 • हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी बंद.
 • मॉल्स, सिनेमा हॉल बंद
 • धार्मिक मंदिरे बंद
 • पीएमपी बसेस 7 दिवसांसाठी संचारबंदीच्या काळात बंद
 • संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीत संचारबंदी
 • कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. 

हेही वाचा - मास्क न वापरण्यात कसलं शौर्य; नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

 • 30 एप्रिलपर्यंत शाळा कॉलेजेस बंदच
 • हॉटेल पार्सल सेवा सुरु राहतील
 • अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
 • लग्न आणि अंत्यसंस्कारासाठी मर्यादीत लोकांच्या उपस्थितीची अट
 • अंत्यविधीला 20 लोकांची उपस्थिती
 • आधी ठरलेल्या लग्नसोहळ्यांनाच परवानगी
 • नियोजित परीक्षा पार पडतील
loading image