esakal | Corona Update: राज्यात दिवसभरात ८,१५९ रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update: राज्यात दिवसभरात ८,१५९ रुग्णांची नोंद

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली आहे. दिवसभरात ८,१५९ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ७,८३९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. (corona update maharashtra daily corona news aau85)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात १६५ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या १,३०,९१८ झाली आहे. तर आजवर ६०,०८,७५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या ९४,७४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईतील कोरोनाची आकडेवारी

मुंबई शहरात आज दिवसभरात ४३५ नवे रुग्ण आढळून आले. तर ५६० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच शहरात आज १३ मृत्यू झाले. शहरात सध्या ६,०२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवर ७,०८,२१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच शहरात एकूण १५,७३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील कोरोनाची आकडेवारी

पुणे शहरात दिवसभरात ३४६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २८७ रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. तसेच ७ रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात दिवसभरात ९,६९७ रुग्णांची चाचणी करण्यात आली. सध्या शहरात २२७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर २८६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

loading image