esakal | Corona Update: राज्यात नवी रुग्णसंख्या, मृतांमध्ये मोठी घट
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update: राज्यात नवी रुग्णसंख्या, मृतांमध्ये मोठी घट

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात आज पुन्हा नव्या कोरोना रुग्णांमध्ये आणि मृतांमध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. दरम्यान, दिवसभरात ३,०७५ रुग्ण आढळून आले तर ३५ जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

राज्यात दिवसभरात ३,०७५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३,०५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच कोरोनाच्या ३५ रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला. राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्ण १६,६७२ आहेत. आजवरची एकूण रुग्णसंख्या ६४,९४,२५४ वर पोहोचली आहे. तसेच आजवर ६३,०२,८१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात एकूण ४९,७९६ मृत्यू झाले आहेत.

मुंबईतील कोरोनाची आकडेवारी

मुंबई शहरात दिवसभरात ३६५ रुग्ण आढळून आले तर २३२ रुग्ण बरे झाले. यामुळे मुंबई शहरातील बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७,११,५५४ वर पोहोचली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के झाला आहे. शहरात सध्या ४,६६६ एकूण सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, शहरात रुग्ण दुपट्टीचा दर हा १,१८५ दिवसांवर पोहोचला आहे. तर कोविड वाढीचा दर ०.०६ टक्क्यांवर पोहोचला.

पुण्यातील कोरोनाची आकडेवारी

पुणे शहरात दिवसभरात १३४ रुग्णांची वाढ झाली तर २८७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच ४ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात शहरात ६,८७९ कोरोना चाचण्या पार पडल्या. शहरात आजवर ८९७३ कोरोनामुळं मृत्यू झाले आहेत. तर २०६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर यांपैकी २१५ जण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.

loading image
go to top